fruit seller famous on tik tok 
पश्चिम महाराष्ट्र

Video : पेरूवाला पांडू मामा झाला 'टिक-टॉक' वर फेमस...! 

विनोद शिंदे

सांगली (म्हैसाळ) - ऐ पेरू... गोड पेरू... अशी खणखणीत आरोळी ऐकली, की 'आला वाटतं पांडू मा', असे शब्द आपसूकच तोंडातून निघतात. शाळांच्या कार्यक्रमात तर याच्या हलगी वादनाशिवाय समारंभच पूर्ण होत नसतो. अशा या हरहुन्नरी पांडू मामाचा त्यांच्या नातीने 'टिक- टॉक'वर केलेला व्हिडिओ त्यांना प्रसिद्ध करून गेला आहे. म्हैसाळसह परिसरात तो कौतुकाचा विषय ठरत आहेच, पण देशभरातून त्याला शेकडो लाईक्‍स मिळत आहेत.

सायकलवर फिरून करतात फळविक्री

पंडित लक्ष्मण जाधव ऊर्फ पांडू हे म्हैसाळ परिसरात हंगामा नुसार फळविक्रीचा व्यवसाय सायकलवर फिरून करत असतात. मात्र त्यांची ओळख ही पेरू विक्रीतून सर्वत्र झाली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वयाच्या पंधराव्या वर्षापासून हा व्यवसाय सुरू केला. आज सेहेचाळीस वर्षे झाली तरी येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत तो सुरूच आहे. याच व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मुला-मुलींचे शिक्षण आणि लग्नाच्यापर्यंतचा सारा खर्च पेलला. आज सुना नातवंडांच्या गराड्यात समाधानाने राहत आहेत, पण पेरू विक्री सुरूच आहे. 

 पांडू मामाला आहे 'हलगीचा' नाद

पेरु विकण्याचा व्यवसाय करत असताना त्यांनी हालगी वाजविण्याचा छंदही जोपासला आहे. कर्मवीर आण्णांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सोहळ्यात लेझीम पथकात यांची हलगी नेहमी वाजत असते. गावात कोणी 'हलगी घेऊन ये म्हटले', की मामा निघालेच. छंद जोपासताना त्यांनी कधी कुटुंबाची परवड मात्र होऊ दिली नाही. कष्टाने कमाई करा, रात्री निवांत झोप येणारच... हा पेरू विकता विकता त्यांचा दिला जाणारा सल्ला सगळेच ऐकून घेत असतात.

पांडूमाच्या नातीने बनवला हा व्हिडिओ

आपल्या आजोबांचा 'टिक-टॉक'वर व्हिडिओ करण्याची कल्पना त्यांच्या सांगलीत राहणाऱ्या मुलीच्या मुलीला आली. नात दीपालीने पांडूमांचा 'एकतर स्लोमोशन जमत नाय आणि हालगी शिवाय करमत नाय' या टायटलचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. सोशल मीडियावर या व्हिडीओला शेकडो लाईक्‍स मिळत आहेत आणि पांडू मामा फेमस झाले आहेत... 

मोबाईलमधे स्वत:ला बघून लई आनंद झाला. नातीने बनवलेल्या व्हिडिओमुळे पेरू विकताना  'पांडूमा व्हिडिओ भारी हाय की' असे लोकांकडून ऐकताना समाधान वाटते. आयुष्यभर सरळमार्गाने हा व्यवसाय केला. गावकऱ्यांनी पण चांगली साथ दिली आहे. 
- पंडित जाधव ऊर्फ पांडू मामा, म्हैसाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT