पश्चिम महाराष्ट्र

बापरे...पुणे बंगळूर महामार्गावर भीषण आग

सकाळ वृत्तसेवा

भुईंज (जि. सातारा) : पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचरच्या कारखान्यास आग लागून दहा लाख रुपये किमतीचे फर्निचर भस्मसात झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गुरुवारी (ता.27) दुपारी साडेतीन वाजता लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.
 
याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुईंज ते जोशीविहीर या दरम्यान महामार्गावर पांडुरंग गुलाबराव गोळे (रा. गुळुंब, ता. वाई) यांचे "श्री फर्निचर' हा फर्निचर निर्मितीचा कारखाना आहे. खालच्या बाजूला गोडाऊन व कारखाना, तर वरच्या बाजूला शोरूम आहे. आज (गुरुवार) दुपारी साडेतीन वाजता अचानक लागलेल्या आगीत कारखान्याचे गोडाऊन व शोरूम पूर्णपणे जळून खाक झाले. त्यात लग्न सराईसाठी बनवलेले नवीन बेड, कपाटे, सोफासेट, टेबल, खुर्च्या आदी फर्निचर जळून खाक झाले. महामार्गावरील वाहन, चालकांनी गाड्या थांबवून मदतकार्य केले; परंतु आगीच्या ज्वाळा वाढतच गेल्या. अनेकांनी आपल्या वाहनात असलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा देखील माेठ्या प्रमाणात आग विझविण्यास रिकाम्या केल्या. यावेळी काही ग्रामस्थांनी किसन वीर कारखान्यास फाेन केला. तेथून आगीची गाडी बाेलाविली. किसन वीर कारखान्याची अग्निशमन यंत्रणा आल्यानंतर आग आटोक्‍यात आली. भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा, हवालदार सुनील पोळ यांनी पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीचा आकडा दहा लाख रुपयांचे आहे. 

हेही वाचा : लई भारी : साताऱ्यातील पोलिसांनी त्याच्या मुसक्‍याच आवळल्या

नक्की वाचा : सातारकरांनाे सावधान! जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल

जरुर वाचा : कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव !

महामार्गावरील वाहन, चालकांनी गाड्या थांबवून मदतकार्य केले; परंतु आगीच्या ज्वाळा वाढतच हाेत्या. पुणे बंगळूर महामार्ग पोलिस मदत केंद्रात अग्निशमन वाहन व यंत्रणा केव्हा येणार? महामार्गावर आगीची दुर्घटना घडण्यापूर्वी तरी "रिलायन्स', महामार्ग प्राधिकरण व महामार्ग पोलिसांनी ही यंत्रणा आणावी अन्यथा दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारावी. 

अंकुश शिंदे, नेते, पेट्रोल पंप संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT