kokane
kokane 
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळमध्ये दिवाळीनिमित्त पोलिसांची गांधीगिरी

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ बाजारपेठेत ग्राहकांना दिवाळीचे साहित्य निर्भयपणे खरेदी करता यावे यासाठी मोहोळ पोलीसांनी गांधीगिरी करत, ग्राहक व व्यापारी यांना सहकार्य केल्याने दोघेही पोलिसांच्या कामगिरीवर खूश आहेत. पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या या अनोख्या फंड्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सध्या मोहोळ बाजारपेठेत ग्राहकांची विविध वस्तु खरेदीची धामधुम सुरू आहे. ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या प्रमाणात शहरात खरेदीसाठी येत आहेत. किराणा, कापड, मिठाई अशी बरीच दुकाने ही शिवाजी चौक ते गवत्या मारूती चौक या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आहेत. आपली दुचाकी व चारचाकी वाहने ग्राहक दुकानासमोर लाऊन खरेदीसाठी दुकानात जातात. मात्र आपण वाहने कुठे व कशी लावतो व आपल्यामुळे इतरांना त्रास होईल का, याचे घेणे-देणे ग्राहक व व्यापारी या दोघांना नसते. मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होऊन अपघात वाढतात तर संघर्ष ही होतो. 

दिवाळीचा सण आहे कोणाला दुखवायचे ही व वाहतुकीचा अडथळ्याची अडचण ओळखून वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिवाजी चौक ते गवत्या मारूती चौक या सुमारे एक किमी. मुख्य रस्त्यावरील वाहने कुठलाही पोलिसी खाक्या न दाखवता बाजुला केली व ध्वनीक्षेपकावरून आवाहन करीत सुरळीत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. त्यामुळे व्यापारी व ग्राहक खूश आहेत. व्यापाऱ्यांनीही आपल्या ग्राहकांना वाहने व्यवस्थित लावण्याबात सूचना द्याव्यात अशी अपेक्षा कोकणे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT