Gang Rape Case Miraj esakal
पश्चिम महाराष्ट्र

महिलेवर सामूहिक बलात्कार करून लग्नासाठी कर्नाटकात विकलं; सातजणांना अटक

Woman gang-raped and sold for marriage in Karnataka; Seven people were arrested | पतीसोबत भांडणानंतर सासर सोडून मिरजेत आलेल्या २३ वर्षीय महिलेवर पाचजणांनी सामूहिक बलात्कार केला.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी ११ जणांविरोधात येथील महात्मा गांधी पोलिस चौकीत (Mahatma Gandhi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

मिरज : पतीसोबत भांडणानंतर सासर सोडून मिरजेत आलेल्या २३ वर्षीय महिलेवर पाचजणांनी सामूहिक बलात्कार करून तिला लग्नासाठी (Marriage) निर्दयीपणे तिला कर्नाटकात (Karnataka) नेऊन चार लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

संबंधित खरेदीदार महिलेने तिचा व्यवहार करून परस्पर लग्न लावून दिले. याप्रकरणी ११ जणांविरोधात येथील महात्मा गांधी पोलिस चौकीत (Mahatma Gandhi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेसह आत्तापर्यंत सातजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी महम्मदहुसेन महम्मदगौस शेख (वय ३१), अबुजर फारुख जमादार (वय १८), महंम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला (वय २०), खालीद मुबारक कोरबू (वय २०), जुबेर ऊर्फ कपाला शब्बीर शेख (वय २४), महम्मदगौस ऊर्फ सरफू शेरखान फकीर (वय २२), संतोषी बाबू नाशिककर (लग्नानंतरचे नाव इरम महम्मदगौस फकीर, वय २६) (सर्व रा. ख्वॉजा वस्ती मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह गंगा आणि मुक्ता नामक दोन महिला, अण्णा नामक एक व्यक्ती आणि कर्नाटकात लग्न लावून दिलेला ब्रातेश (रा. जमखंडी) अशा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असे अडकले नराधम

नराधमांपैकी मिरजेतील ख्वॉजा वस्तीतील एकाचे नेमके नाव पीडितेला ज्ञात होते. मिरजेतील तपासाधिकारी निरीक्षक सुधीर भालेराव त्या नावावरून सर्व आरोपींपर्यंत पोहचले. पोलिस तपासात सर्व सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल लोकेशन जुळत असल्याने पीडितेच्या बोलण्यात तथ्य असल्याचे स्पष्ट होताच गतीने कर्नाटकपर्यंत पोलिसांनी माग काढत सर्व सूत्रे जुळवली. लवकरच उर्वरित आरोपींनाही गजाआड केले जाईल, असे श्री. भालेराव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT