Garbage in kolhapur collector office.gif 
पश्चिम महाराष्ट्र

चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच..

सकाळ वृत्तसेवा

रमणमळा (कोल्हापूर) : हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जिल्ह्याचा महसूल गोळा करणारी ही यंत्रणा. केंद्रशासन, महाराष्ट्र शासन गेली काही वर्षे सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेविषयी वारंवार जनजागृती अभियान सुरु आहे; पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात गेलात की, तुम्हाला जागोजागी, कोपऱ्याच्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग पाहावयास मिळते. गेली काही वर्षे येथे स्वच्छता झालेली नसल्याचे दिसते. स्वच्छतेचा अभाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिन्याच्या खाली, तसेच परिसरात जागोजागी दिसतो.

हे पण वाचा- ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला  

"स्वच्छता ठेवा, स्वच्छता राखा डेंगी पळवा...', असे स्वच्छतेचे फलक जागोजागी दिसतात; पण ते फलकही अडगळीत पडले आहेत. काही फलकांवर तर बुरशी चढल्याने फलकांवर काय आहे, ते दिसतही नाही. अनेक फलाकांना तर अक्षरश: गंज चढला आहे. हे फलक कुठेही नेऊन टाकले आहेत. काही फलकांवर धुळीची पुटे चढली आहेत. झाडांच्या कुंड्यातील झाडे पूर्णपणे वाळून गेली आहेत.

हे पण वाचा- ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ 

ऑगस्टमध्ये महापुर आला. महापुराचा वेढा खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला. तेव्हापासून ते आजतागायत महापुरात अडकलेला कचराही जागोजागी दिसतो. यात मोडकळीस आलेले फर्निचर दिसते. अनेक ठिकाणी प्लास्टिक कचरा अन्‌ धुळीने तर पूर्ण परिसर भरुन गेला आहे. जागोजागी "स्वच्छता राखा, डेंगी पळवा...' असे फलक दिसतात. पिण्यासाठी पाणी आहे; पण तिथे प्यायला पाणी नाही. अनेक फिल्टर्स मोडकळून पडले आहेत. जिथे थुंकू नका, असे फलक आहेत; तिथे थुंकलेले दिसते. स्वच्छतागृहातही स्वच्छता दिसत नाही. स्वच्छतागृहात दुर्गंधी पसरली आहे. जिन्याच्या खाली पेपर, प्लास्टिकच्या बॉटल्या पडल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस कोणी जातात की नाही, असा प्रश्‍न पडतो. मागील बाजूल गवत भरलेले आहे. तेथेही स्वच्छ केलेली दिसत नाही. जिथे कचरा जाळला जातो, त्याची राख, कचऱ्याचे तुकडेही वेळोवेळी भरले गेलेले नाहीत. या परिसराला एखादा झाडू फिरला; खरेच स्वच्छता केली तर तो परिसर नक्कीच स्वच्छ, सुंदर होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम आपल्या परिसरातील, कार्यालयातील स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT