Gas is not available to schools for mid day meal 
पश्चिम महाराष्ट्र

शालेय पोषण आहार चुलीवरच..

सकाळ वृत्तसेवा

नगर : शाळांमध्ये पोषणआहार गॅसच्या माध्यमातून शिजवावा, असे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे शाळांमध्ये अद्याप चुलीवरच आहार शिजविला जात आहे. 

जिल्ह्यात 4464 शाळांना शालेय पोषणआहार योजना लागू आहे. या सर्व शाळांमध्ये पोषणआहार गॅस शेगडीवर शिजविण्यात यावा, असे शासनाचे निर्देश असले, तरी शासनाकडून अद्याप अनेक शाळांना गॅस उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे साडेसहाशे शाळांमध्ये चुलीवरच पोषणआहार शिजविला जात आहे. जिल्ह्यातील 3481 शाळांमध्ये शासन अनुदानातून गॅसची जोडणी देण्यात आली असून, 337 शाळांना लोकसहभागातून गॅसजोडणी देण्यात आलेली आहे. अशा एकूण 3818 शाळांना गॅसजोडणी दिलेली आहे. 

एकाच सिलिंडरमुळे गोंधळ

जिल्ह्यातील शाळांना शासन अनुदानातून व लोकसहभागातून गॅसजोडणी देण्यात आली आहे. काही शाळांकडे एकच गॅस सिलिंडर आहे. ते संपल्यानंतर दुसरे सिलिंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या काळात या शाळांना चुलीवरच पोषणआहार शिजवावा लागत आहे. 

अकोल्यात सर्वाधिक शाळा गॅसविना

जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांपैकी अकोले तालुक्‍यातील 148 शाळांना अद्यापही गॅसजोडणी मिळालेली नाही. त्यामुळे या सर्व शाळांमधील शालेय पोषणआहार चुलीवरच शिजविला जात आहे. नगर तालुक्‍यातील 283 शाळांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध असल्याने पोषणआहार गॅसवर शिजविला जातो. 

शाळांकडून होतेय प्रदूषण

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देणाऱ्या शाळांमध्येच चुलीवर आहार शिजवून हवा प्रदूषित केली जात आहे. चुलीवर आहार शिजविण्याच्या प्रक्रियेमुळे शाळांमध्ये काही ठिकाणी धूर होत असल्याने, त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.

  • शालेय पोषणआहार लागू असलेल्या शाळा- 4464 
  • शासनाची अनुदानित गॅसजोडणी दिलेल्या शाळा- 3481 
  • लोकसहभागातून गॅसजोडणी मिळालेल्या शाळा - 337 
  • गॅसजोडणी नसलेल्या शाळा - 646 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT