This Gram Panchayat directly challenges Modi 
पश्चिम महाराष्ट्र

असं काय घडलं... या ग्रामपंचायतीने थेट मोदींना आव्हान द्यावं

सकाळ वृत्तसेवा

नगर : देशभरात बहुचर्चित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रान पेटलेले आहे. सीएए, एनपीआर, एनआरसी आदी मुद्यांवर देशात विरोध तीव्र होत आहे. आंदोलने, मोर्चे, निषेध सभांचे शहरी भागातील हे लोन आता ग्रामीण भागात पसरत आहे. इसळक (ता. नगर) येथील ग्रामसभेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारलाच आव्हान दिले आहे. नागरिकत्त्व कायद्याविरोधात ठराव घेऊन सरकारचा निषेध केला. प्रथमच अशा प्रकारे एका खेडे गावाने देशाच्या संसदेने केलेल्या कायद्याला विरोध केला आहे. एकंदरीत ग्रामसंसद संसदेच्या विरोधात उभी ठाकली आहे. बहुदा देशातील ही पहिलीच घटना असावी. 

ठराव एकमताने मंजूर 
ग्रामस्थांनी या कायद्याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाला या बाबत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. रहिवाशी असल्याबाबत व नागरिकत्व असल्याचे सर्व पुरावे असतानादेखील सामान्य जनतेने नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करून महादेव गवळी यांनी हा ठराव मांडला. इसळक गावात आदिवासी जाती-जमाती, आणि इतर मागास व दुर्बल घटकांची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अल्पशिक्षित समाज असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे मत गवळी यांनी व्यक्त केले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 

यावेळी ज्येष्ठ नागरिक व ग्रामसभेचे अध्यक्ष सुखदेव पाटील गेरंगे, सरपंच बाबासाहेब गेरंगे, उपसरपंच अमोल शिंदे, सदस्य योगेश गेरंगे, चंदू खामकर, माजी सरपंच संजय खामकर, तुकाराम गेरंगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत गावांतर्गत रस्ते, पाणी, गटार योजना, डिजीटल ग्रामपंचायत, कुष्ठरोगाबाबत जनजागृती आदी विषयांवर चर्चा झाली. ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे वाचन ग्रामसेवक बद्रीनाथ घुगरे यांनी केले. आभार सरपंच गेरंगे यांनी मानले. 

तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजी! 
ग्रामसभेत निंबळकचे तलाठी कैदके आणि नागापूर मंडळाचे मंडलाधिकारी आव्हाड यांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक नोंदी प्रलंबित आहेत. नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. अधिकारी मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे उपसरपंच अमोल शिंदे यांनी सांगितले. याचा जाब विचारला तर उलट कायदेशीर कारवाईची करण्याची धमकीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते. प्रलंबित नोंदीबाबत तहसीलदार यांच्याकडे सदरचा ठराव पाठविला जाणार आहे. 

जनभावनेचा आदर करा - योगेश गेरंगे 
नागरिकत्व कायद्यावरून जनतेला हकनाक वेठीस धरण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. कोणताही कायदा लागू करताना जनभावना लक्षात घ्यावी. घटनेतील समतेच्या आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला छेद देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा. यापूर्वी जनविरोधी कायदे तत्कालीन सरकारांनी मागे घेतलेले आहेत, असे ऍड. योगेश गेरंगे यांनी सांगितले. 

..हा कुटील डाव - अमोल शिंदे 
नागरिकत्व कायदा लागू करून सोईस्कर राजकीय सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपप्रणीत सरकारने हा कुटील डाव टाकला आहे. तो आदिवासी जाती-जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अन्याय करणारा ठरणार आहे. वेळीच हा कट उधळून लावला पाहिजे, असे अमोल शिंदे यांनी भावना व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT