gram panchayat election belgaum 2020 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस ; राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला 

गिरीश कल्लेद

बेळगाव - ग्राम पंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवार दिनांक 22 रोजी होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बऱ्याच उमेदवारानीं प्रचाराला सुरुवातही केली आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचा ज्वर पसरला आहे.

यंदाची ही निवडणूक राजकीय पक्षांनी ही प्रतिष्ठेची बनवली आहे. पक्ष पुरस्कृत उमेदवार रिंगणात उभे केले आहेत यामुळे ग्राम पंचायत निवडणुकीतील उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र ग्राम पंचायती  म. ए. समितीचे बालेकिल्ले असून हे किल्ले अभेद्य राहणार आहेत आणि ग्राम पंचायतींवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकणार हे निश्‍चित आहे.
 

 जिल्ह्यातील  बेळगावसह खानापूर, हुक्केरी,  बैलहोंगल, कित्तूर, गोकाक आणि मुडलगी या सात तालुक्यांमधील 259 ग्रामपंचायती साठी मंगळवार दि. 22 रोजी मतदान होणार आहे. असंख्य इच्छुकांनी  निवडणूक जाहीर होण्या आधीपासूनच वातावरण निर्मितीसाठी गावात प्रचार करण्याबरोबरच मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. तर आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार गतीने सुरू केला आहे. यामुळे तालुक्यातील गावागावात केवळ निवडणुकीची चर्चा सुरू आहे. दिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच मतयाचना सुरू केली आहे. बर्‍याच भागात आतापासूनच रात्रीच्या ओल्या पार्ट्याही सुरू झाल्या आहेत.
 यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाचा पुरस्कृत उमेदवार निवडून यावा यासाठी प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. मात्र म. ए. समिती ग्राम पंचायतींवरील आपली पकड राखण्यात यशस्वी होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. गावागावातून पॅनल करून उमेदवार उभे करण्याचे तसेच आरक्षण आधारित उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना निवडणुकीत उभे करण्याचे  काम राजकीय पक्षाच्या वतीने झाले आहे. या उमेदवारांचा  खर्चही पक्षाच्या वतीने होणार आहे. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचा जोर सुरू झाला आहे.

एकीकडे ग्रामीण भागात ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या भागातील शेतातील कामांनाही सध्या जोर आला आहे.  मात्र ग्राम पंचायत निवडणूक कामात बरेच जण गुंतलेले असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. गावागावातून केवळ निवडणुकीची आणि उमेदवारांची चर्चा सुरू आहे. तर आतापासूनच जय-पराजयाचे आराखडे बांधण्यात येत आहेत. एकूणच या महिन्यात तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचीच चर्चा सुरू  आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Makar Sankranti 2026: तुळशीशी संबंधित 'या' 3 चुका टाळा, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT