Dilip Valase Patil 
पश्चिम महाराष्ट्र

सिद्धेश्‍वर यात्रेला उपस्थित राहून पालकमंत्री करणार कामाचा श्रीगणेशा?

अशोक मुरूमकर

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात सोलापूरला स्थान मिळाले नसल्यामुळे या वेळी जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री मिळाले. त्यात दिलीप वळसे-पाटील यांच्या वाट्याला सोलापूर जिल्हा आला आहे. पालकमंत्री होऊन आठ दिवस होत आले; मात्र त्यांनी अद्याप सोलापूरचा दौरा केलेला नाही. त्यातच पुढील आठवड्यात येथील सर्वांत मोठी समजली जाणारी श्री सिद्धेश्‍वर यात्रा भरत आहे. त्यातील मुख्य समजल्या जाणाऱ्या अक्षता सोहळ्याला ते उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामांचा श्रीगणेशा करणार आहेत, असे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील आमदार मंत्रिपदापासून वंचित
कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन धक्कादायकपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. सर्वांत जास्त जागा मिळवूनसुद्धा भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील शिवसेनेचे शहाजी पाटील, मंगळवेढा-पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे भारत भालके, सोलापूर शहर मध्यमध्ये कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे, मोहोळ येथील राष्ट्रवादीचे यशवंत माने, माढा मतदारसंघात बबनराव शिंदे व करमाळा मतदारसंघातून संजय शिंदे (अपक्ष) हे आमदार आहेत. यामध्ये बबनराव शिंदे, भारत भालके किंवा प्रणिती शिंदे यांच्यापैकी कोणाला तरी मंत्रिपद मिळेल, अशी शक्‍यता होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे या वेळी सोलापूर जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री आले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लागली आहे.

पालकमंत्र्यांसमोर असणार जिल्ह्यातील प्रश्‍नांचे आव्हान
वळसे-पाटील यांची पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतरचा सर्वांत मोठा उत्सव हा सिद्धेश्‍वर यात्राच आहे. या यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. या यात्रेची सुरवात झालेली आहे. मात्र, त्यातील मुख्य आकर्षण असलेली नंदीध्वज मिरवणूक व अक्षता सोहळा पुढील आठवड्यात होणार आहे. यानिमित्त पालकमंत्री उपस्थित राहून त्यांच्या कामांचा श्रीगणेशा करतील, अशी शक्‍यता आहे. सोलापुरातील विमानतळ, टेंभुर्णी - करमाळा - अहमदनगर महामार्ग, जिल्ह्यातील रस्ते, पाणी व शेती प्रश्‍नासह इतर प्रश्‍न सोडवण्याचे आव्हान नवीन पालकमंत्र्यांसमोर असणार आहे. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण दरवर्षी भरते; मात्र योग्य नियोजनाअभावी शेवटी पाणी कमी पडते. त्यात पालकमंत्री वळसे-पाटील हे कसे लक्ष घालणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

संकेतस्थळावर अजूनही झळकेनात पालकमंत्री
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटील यांची बुधवारी (ता. 8) नियुक्ती झाली. याला चार दिवस उलटले तरी त्यांचे छायाचित्र सोलापूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर झळकलेले नाही. संकेतस्थळावर अजूनही फक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचेच नाव व छायाचित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT