पश्चिम महाराष्ट्र

#SSCL 'गुरुकुल' की 'पोदार' आज ठरणार विजेता 

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात आज (मंगळवार) गतविजेत्या गुरुकुल स्कूलची लढत पोदार इंटरनॅशनल स्कूलबरोबर होणार आहे. स्पर्धेत दोन्ही संघांची एकमेकांशी गटात गाठ पडली होती. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंना अंतिम सामन्यासाठीची व्यूहरचना बदलावी, की तशीच ठेवावी याची संधी मिळाली आहे.

ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येत आहे. सकाळच्या सत्रात पहिला उपांत्य फेरीचा सामना के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि गुरुकूल स्कूल यांच्यात झाला. या सामन्याचे नाणेफेक एस. जी. सी ग्रुपचे संचालक सचिन आगाणे यांच्या हस्ते झाले. गुरुकुल स्कूलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. शानभागच्या ओम खटावकर आणि ओम शिंदे ही सलामीची जोडी गुरुकुलच्या राहुल वाघमळेने खटावकरला बाद करून पहिल्याच षटकात फोडली. आकाश पांडेकरेने ओम शिंदेच्या साथीने एकेरी दुहेरी धावा काढण्यास प्रारंभ केला. दोघांनी 50 धावांची भागीदारीही केली. आठव्या षटकांत राहुल वाघमळेने आकाश पांडेकरचा त्रिफळा उडविला. त्यापाठोपाठ प्रथमेश वेळेकरने अद्वैत प्रभावळकरच्या गोलंदाजीवर ओम शिंदे आणि ओम केसरकरचा झेल टिपला. त्यानंतर हर्ष सोनावले आणि प्रफुल्ल माने यांनी शानभाग विद्यालयाचा डाव सावरला. शानभागच्या 18.2 षटकांत सर्वबाद 106 धावा झाल्या. गुरुकुलच्या अरमान मुल्लाने 3 षटकांत नऊ धावांत चार, राहुलने 4 षटकांत 19 धावांत दोन, अद्वैतने 3.2 षटकांत निर्धाव एक षटक टाकत 24 धावांत तीन, तसेच शार्दुलने एक गडी बाद केला.

हेही वाचा - Video : अन् जवानांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

विजयासाठी 107 धावांचे उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेली गुरुकूलची सिद्धार्थ शितोळे आणि शार्दुल फरांदे या सलामीची जोडीतील शितोळे हा दुसऱ्याच षटकात शानभागच्या साईदत्ता साबळेच्या गोलंदाजीवर सहा धावांवर पायचीत झाला. पाचव्या षटकांत अद्वैतला प्रफुल्ल मानेने एक धावेवर झेलबाद केला. त्या वेळी गुरुकुलची धावसंख्या दोन बाद 29 अशी होती. त्यानंतर शार्दुलच्या साथीस आर्य जोशी आला. दोन्ही फलंदाजांनी शानभागच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. गुरुकुलची धावसंख्या 99 वर पोचली असताना शार्दुलला (42 चेंडूंत 32 धावा) प्रफुल्ल माने याने त्रिफळाबाद केला. त्यानंतर आर्यने नाबाद 48 (39 चेंडूंत आठ चौकार) हर्ष जाधवच्या साथीने संघाचा विजय नोंदविला. हेम ग्रुपचे विपुलभाई शहा यांच्या हस्ते अरमान मुल्ला यास सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले.

दुपारच्या सत्रातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पोदार इंटरनॅशनल स्कूलने निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूलचा 107 धावांनी दणदणीत पराभव केला. जे. के. देवी सन्सचे समीर देवी यांच्या हस्ते नाणफेक झाली. पोदारने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोदारच्या स्वयंभू स्वामी आणि हर्षवर्धन देसाई या सलामीच्या जोडीने मैदानावर तुफान फटकेबाजी केली. यामुळे निर्मलाचे गोलंदाज हतबल झाले. हर्षवर्धन 12 व्या षटकांत धावबाद झाला. पोदारच्या 13.1 षटकांत 101 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कौशल भडगावेने स्वयंभूस साथ दिली. स्वयंभू 19 व्या षटकांत पार्थच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच्या 57 चेंडूंत एक षटकार आठ चौकारांसह 72 धावा झाल्या, तर कौशलच्या 23 चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद 23, साहिल औताडेच्या पाच चेंडूंत दोन चौकारांसह 13 धावा झाल्या.

जरुर वाचा- Video : उदयनराजे सध्या काय करतात...

प्रत्युत्तरात निर्मलाचा डाव पोदारने अवघ्या 64 धावांत गुंडाळला. अर्जुन वाघ 14, पार्थ 13 आणि युवल गुलाटी नाबाद 15 यांच्या व्यतरिक्त एकाही खेळाडूस दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पोदारच्या अलोक गायकवाड 4-2-3-2, अथर्व डोईफोडे 4-1-6-2, कौशल भडगावे 2-11-1, अथर्व भोसले 2-15-1, कपिल जांगीड 3-18-2, आदित्य जाधव 2-10-1 यांनी उत्तम गोलंदाजी केली. कणसे हुंदाईचे मॅनेजिंग डायरेक्‍टर ऋतुराज कणसे यांच्या हस्ते स्वयंभू स्वामी यास सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 

 
साखळी सामन्यात गुरुकुल स्कूलने पोदारला नमविले 
 
दरम्यान, रविवारी (ता. दोन) अ गटातील साखळी सामन्यात गुरुकूल स्कूलने पोदार इंटरनॅशनल स्कूलवर तब्बल 71 धावांनी विजय मिळविला होता. या सामन्यात गुरुकुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पोदार संघाच्या 13.2 षटकांत सर्वबाद 71 धावा झाल्या. गुरुकुलच्या राहुल वाघमळेस कैलास ज्वेलर्सचे पंकज नागोरी यांच्या हस्ते सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 
संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल स्कूल 20 षटकांत 7 बाद 142. सिद्धार्थ शितोळे 15, शार्दुल फरांदे नाबाद 66 (52 चेंडूंत सहा चौकार), आर्य जोशी 14, हर्ष जाधव 4, अद्वैत प्रभावळकर 6, प्रथमेश वेळेकर 13, सिद्धेश गोरे 10. अथर्व भोसले 4-27-3, अलोक गायकवाड 4-27-2, अथर्व डोईफोडे 4-21-1 वि.वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल 13.2 षटकांत सर्वबाद 71. स्वयंभू स्वामी 15, कौशल भडगावे 11, चैतन्य खुस्पे 10, अथर्व भोसले 11. राहुल वाघमळे 4-1-10-4, पार्थ सावंत 2-17-3, अद्वैत प्रभावळकर 1, अरमान मुल्ला 1, हर्ष जाधव 1.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT