He just wanted men where was that happening 
पश्चिम महाराष्ट्र

त्याला फक्त माणसं खायचीत... कुठं घडतंय असं

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : प्रवरा नदीकाठच्या गावांमध्ये त्याने धुमाकूळ घातला आहे. फक्त माणसंच त्याची सावज आहेत. माणसं सोडून त्याला काहीच खायचं नाही, अशा पद्धतीने तो हल्ले करतोय. नदीकाठच्या पिंपळगाव फुणगी (ता. राहुरी) येथे जाधव वस्तीवर आज सकाळी तीन वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला. आजी व चुलत्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. त्यामुळे ती सुदैवाने बचावली. तिच्या गालावर आणि हातावर खोल जखमा झाल्या आहेत. तिच्यावर नगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
श्रेया मंजाबापू जाधव, असे या मुलीचे नाव आहे.

आरडाओरड केल्याने तो पळाला

आज सकाळी साडेअकरा वाजता ती अंगणातील झाडांची फुले तोडण्यात मग्न होती. घराच्या डाव्या बाजूला असलेल्या गव्हाच्या शेतात तिला हालचाल जाणवली. तिने जोरात ओरडून घरातील व्यक्तींना हाका मारल्या. श्रेयाची आजी शोभाबाई व चुलते शरद, आत्या जया बाहेर आले. तेवढ्यात बिबट्याच्या बछड्याने श्रेयावर झडप घातली. आजी, चुलते व आत्याने मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने श्रेयाला सोडून देऊन घराच्या उजव्या बाजूकडील मक्‍याच्या शेतात पळ काढला. 


श्रेयाचे वडील मंजाबापू ऊसतोडणीला गेले होते. आई सुवर्णा शेतात काम करीत होती. घटनेची माहिती समजताच दोघांनीही घरी धाव घेतली. श्रेयाला जवळच असलेल्या कोल्हार येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून तिला नगर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याच्या पंजामुळे श्रेयाच्या गालावर व हातावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. तिचे प्राण थोडक्‍यात वाचले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 
घटनेची माहिती समजताच वनरक्षक विकास मोरे, सुनील अमोलिक, समाधान चव्हाण, वनपाल सचिन गायकवाड घटनास्थळी गेले. राहुरी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. वन खात्याकडे एकूण पंधरा पिंजरे आहेत. रहिवाशांच्या मागणीवरून बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी सर्व पिंजरे लावण्यात आले आहेत. 

चार दिवसांपूर्वीही दिसला बिबट्या 
जाधव वस्तीच्या जवळच बांधकाम व्यावसायिक दिलीप जगताप यांच्या चिकूच्या बागेतही आठ दिवसांपूर्वी मजुरांना बिबट्याचा बछडा दिसला होता. नंतर चार दिवसांपूर्वी जगताप यांच्या विहिरीजवळ हाच बिबट्या पाणी पिण्यासाठी आल्याचे शेतमजुरांनी पाहिले होते. त्यामुळे वन खात्याने शुक्रवारी (ता. एक) तेथे पिंजरा लावला आहे. 

प्रवराकाठी भीतीचे वातावरण 
बेलपिंपळगाव रस्त्यालगत टाकळीभान (ता. श्रीरामपूर) शिवारातील मधुकर वेताळ यांच्या घरासमोरील शेळी व कुत्र्याचा बिबट्याने शनिवारी (ता. एक) मध्यरात्री फडशा पाडला. श्रीरामपूर तालुक्‍यातील खोकर, उक्कलगाव, ऐनतपूर, वळदगाव परिसरातही बिबट्याने दर्शन दिले आहे. आतापर्यंत पाळीव प्राण्यांवर हल्ले करणाऱ्या बिबट्याने आता मानवी वस्तीत हल्ले सुरू केल्याने दहशत निर्माण झाली आहे. प्रवराकाठी असलेल्या गळनिंब, फत्त्याबाद, कुरणपूर, मांडवे, कडीत (ता. श्रीरामपूर), तसेच पिंपळगाव, मांडवे खुर्द, आंबी, केसापूर (ता. राहुरी) परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

दहा गावांत पिंजरे
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी गळनिंबसह नदीकाठच्या दहा गावांमध्ये दहा पिंजरे लावण्यात आले आहेत. आणखी चार पिंजरे लावण्यात येणार आहेत. वन विभागाचे दहा कर्मचारी तैनात केले आहेत. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी पुणे येथून पथकाला पाचारण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी रात्री घराबाहेर पडू नये. जायचेच असेल, तर रेडिओ अथवा घुंगराची काठी सोबत ठेवावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. 
- रमेश देवखिळे, सहायक वनसंरक्षक, राहुरी. 

पाच महिन्यांत तिसरी घटना 
- 5 सप्टेंबर 2019 फत्त्याबाद (ता. श्रीरामपूर) येथील दर्शन देठे (वय नऊ) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. 
- 31 जानेवारी 2020 ः गळनिंब (ता. श्रीरामपूर) येथील ज्ञानेश्वरी नामदेव मारकड (वय 3) बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी. 
- 3 फेब्रुवारी 2020 ः पिंपळगाव फुणगी (ता. राहुरी) येथे जाधव वस्तीवर श्रेया जाधव बिबट्याच्या हल्ल्यात जखमी 
- तिन्ही गावे जवळजवळ आणि प्रवरा नदीच्या परिसरात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT