He was sentenced to twenty years imprisonment 
पश्चिम महाराष्ट्र

त्याला वीस वर्षे सक्‍तमजुरी

सूर्यकांत वरकड

नगर : इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात पस्तीस वर्षीय आरोपीला दोषी धरीत जिल्हा न्यायालयाने वीस वर्षे सक्‍तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. मनोज हरिहर शुक्‍ला (वय 35, रा. भरसाळ, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश), असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित मुलीचे आई-वडील नेपाळमधील रहिवासी आहेत. ते रोजगारासाठी पारनेर तालुक्‍यात आले होते. मुलीचे वडील हॉटेलमध्ये आचारी होते. मुलगी पारनेर येथील शाळेत शिकत होती. 11 मे 2017 रोजी सकाळी साडेदहा वाजता आई घरात काम करीत असताना पीडित मुलगी घराबाहेर बसली होती. त्या वेळी शेजारी राहणारा आरोपी मनोज शुक्‍ला मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीत घेऊन गेला. आईला बाहेर आल्यानंतर मुलगी दिसली नाही. तिने इतरत्र शोध घेतला असता मुलगी आरोपीच्या खोलीमध्ये आढळून आली. त्या वेळी आरोपीने खोलीला आतून कडी लावली होती. आईने विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 12 मे 2017 रोजी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी धरीत वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. अनिल सरोदे यांनी बाजू मांडली. या खटल्यात सरकारी वकिलांना सहाय्य करण्यासाठी पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण काशीद यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

दोन महिन्यांत आरोपीला शिक्षा 
खटल्याचे कामकाज सुरू झाल्यापासून दोन महिने व सात दिवसांमध्ये सुनावणी झाली. त्यात प्रत्यक्ष सहा दिवस सुनावणी झाली. दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लागला आणि आरोपीला शिक्षा झाली. 

...कमी अवधीत निकाल लागला असता
खटला सुनावणीला आल्यानंतर पीडित मुलगी सहा वर्षांची असल्याने न्यायालयाने विलंब न करता साक्षीदारांचे साक्षी-पुरावे नोंदविले. यापेक्षाही कमी कालावधीत खटल्याचा निकाल लागला असता परंतु, पीडित मुलगी नेपाळ येथे वास्तव्यास असल्याने तिला घेऊन येण्यास जास्त कालावधी लागला. खटल्यात पीडिता आणि तिची आई यांची साक्ष व न्यायवैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. 
- ऍड. अनिल सरोदे, सहायक सरकारी अभियोक्ता  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT