पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पावसाने दाणादाण

सकाळवृत्तसेवा

सांगली - शहराला मंगळवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने झोडपून काढले. सकाळी पावसाच्या धुमाकूळाची नेमकी जाणिव नागरिकांना झाली.

मारुती रोड, स्टेशन चौक, गुंठेवारी परिसरात तुंबलेल्या ड्रेनेजने स्थानिक रहिवाशी व्यापाऱ्यांच्या नाकी नऊ आणले. मारुती चौकाचे तळे झाले. फेसाळणारा शेरीनाला नदीपात्रात मिसळल्याने कृष्णेचे प्रदुषण होत असल्याची जाणीव ही या पावसाने करून दिली. जुन्या स्टेशन रस्त्यावरील टेलिफोन कार्यालयाजवळील भिंतीलगतचे झाड मुळापासून उखडून पडले होते. ते हटवण्यासाठी पालिकेची यंत्रणा रात्रभर राबत होती. 

फोटो फिचर - पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रावणातील किरकोळ सरी वगळता तशी दोन महिने उघडीपच आहे. सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा होती. सप्टेंबरमध्येच ऑक्‍टोबरचा उष्मा जाणवत होता. ढग दाटून आले तरी पाऊस हुलकावणी देत होता. काल मात्र नेहमीचा अंदाज साफ कोसळवत सरी कोसळल्या. रात्री साडेनऊला तुषार पडू लागले आणि रात्री बारानंतर पावसाने अशी काही हजेरी लावली की पार भंबेरीच उडवली.

आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. सायंकाळी दिलेल्या चकव्यानंतर रात्री पुरते उट्टे काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटांमुळे ठोका चुकला. अंधारात तीव्र प्रकाशाची लकेर आणि त्यापाठोपाठ विजेचा हादरवून सोडणारा विजेचा कडकडाट भिती वाटावी असा खेळ सुरु होता. शहराला सुमारे दोन तास झोडपून काढले. प्रमुख चौक तुंबले. मारुती चौक, स्टेशन रोड, झुलेलाल चौक, सिव्हील हॉस्पिटल रोड या प्रमुख रस्त्यांवर ड्रेनेजचे पाणी तुंबल्याने साचले होते. स्टेशन रोडवर एक झाड मुळापासून उखडून पडले. महापालिका यंत्रणेने तातडीने झाड कापून बाजूला केले. 

गुंठेवारीतही पावसाने पार दैना उडवली. काही दिवसांपुर्वीच या भागात मुरुमीकरण केले होते. मात्र पावसाने आता तेथे चिखल झाला आहे. शामरावनगर, दत्तनगर, रामकृष्णनगर, आप्पासाहेब पाटीलनगर आदी परिसरात तसेच कर्नाळ रस्त्यावरील सखल भागातही पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. साचलेले पाणी काढून त्यांना घरातून बाहेर पडावे लागले. परिसरात पाण्याची तळी झाल्याने चालणे तर मुश्‍किलच बनले उलट वाहनेही जात नव्हती. 

इथेही राजकारण 
येथील शिवपुतळ्याजवळील भाजी मंडईत आज तुंबलेल्या ड्रेनेजमुळे सारा मैला रस्त्यावर साचला. सकाळी बाजारात येणाऱ्यांना नाक धरूनच यावे लागले. इथे मंडई भाजीपाला विक्री करणे म्हणजे आरोग्याशीच खेळ मांडला होता. व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांनी फोन केला असता आम्ही मारुती चौकात आलेले त्यांना चालत नाही असे सांगत त्यांनी टाळले. लोकांच्या जीवाशी खेळ मांडला असताना नगरसेवकांना राजकारण सुचत असल्याबद्दल व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT