high profile rating check from police in belgaum
high profile rating check from police in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

‘हाय प्रोफाईल’वर आता पोलिसांची नजर ; बेळगावात व्यवसाय चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : हाय प्रोफाईल वेश्‍या व्यवसायावर पोलिसांनी अखेर नजर वळविली आहे. मागील दोन दिवसांत पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हाय प्रोफाईल व्यवसाय चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिकसह मुंबई आणि पुणे येथून युवतींना आणून बेळगावात हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. आता पोलिसांनी त्याची पाळेमुळे खणण्यास सुरवात केल्याने रॅकेटमधील लोक भूमिगत होऊ लागले आहेत.

बेळगाव जरी शांत दिसत आले, तरी मागील काही वर्षापासून बेळगावातील उच्चभ्रू वसाहती आणि शांत ठिकाणी हाय प्रोफाईलचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरु आहे. टिळकवाडी, अनगोळ, हनुमाननगर, सदाशिवनगर अशोकनगर, महांतेशनगर अशा शहरातील उपनगरीय भागात हा व्यवसाय फोफावू लागला आहे. स्पा आणि सलूनच्या नावाखाली मसाज सेंटर स्थापून त्याठिकाणी सुरू असलेले हाय प्रोफाईल रॅकट काल (ता. ६) पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले. त्यापाठोपाठ आज सदाशिवनगर येथे सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश केला.

दोन दिवसांत दोन ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी हाय प्रोफाईल व्यवसायावर आपली नजर वळविल्याचे दाखवून दिले आहे. यापूर्वी पोलिसांनी केलेली कारवाई ही बेळगावमध्ये आधीच बदनाम असणाऱ्या लॉजवरील होती, पण आता पोलिसांनी सुरु केलेली कारवाई ही मोठी आहे. बेळगावातील हाय प्रोफाईलच्या ठिकाणी येणाऱ्या युवती पुणे आणि मुंबईतून बोलविल्या जातात. उच्चभ्रू परिसरात अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन तेथे व्यवसाय थाटला जातो.

ठराविक कस्टमर आणि त्यांच्या ओळखीवरच हा व्यवसाय होतो. त्यामुळे अशा रॅकेटवर जास्त कोणाची नजरही जात नाही. तीन दिवसाला येथील युवती बदलल्या जातात. पुणे आणि मुंबईहून येणाऱ्या युवती प्रत्येक शहरात फिरत असतात. बेळगावातून पुढे दांडेली, रामनगर ते अगदी गोवा आणि बंगळूरलाही त्या पोचतात. नंतर पुन्हा पुणे, मुंबईकडे परततात. वर्षातून त्यांचा हा प्रवास ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येकवेळी बेळगावातील कस्टमरना नवीन युवती म्हणून अशा युवतींची गाठ घालून दिली जात असल्याची चर्चा आहे. 

"शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याची सूचना सर्व पोलिस ठाण्यांना करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. मसाज पार्लरना सर्व प्रकारची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देण्याचे आदेश बजावले आहेत. यापुढेही याविरोधात कारवाई सुरूच राहील."

- डॉ. विक्रम आमटे, पोलिस उपायुक्त

संपादन - स्नेहल कदम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT