home rent issues in kolhapur. 
पश्चिम महाराष्ट्र

साहेब! घरमालकाला त्रास का... 

राजेश मोरे

कोल्हापूर  ः भाडेकरूने गैरकृत्य केले, तो चोरटा निघाला, त्यात आमचा काय दोष?, साहेब! तुमच्या चौकशीचा आम्हाला त्रास का?. असा सवाल घेऊन येणारे घरमालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. भाडेकरूबाबतची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला न कळविणे हा घरमालकांचा निष्काळजीपणा हेच त्यामागचे कारण असते. 

जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या, लुटमारी, खून, हाणामाऱ्याचे प्रकार वारंवार घडतात, असे गुन्हे उघडकीस येतात. त्यावेळी गुन्हेगार हे जिल्हाबाहेरून अगर परप्रांतिय असल्याचे उघड होते, असे गुन्हेगार भाडेकरू म्हणून राहतात. टेहाळणी, रेकी करतात आणि हात साफ करून जातात असेही पुढे आले. यावर उपाय म्हणून घरमालकांनी भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन केले होते. चार ते पाच वर्षापूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्याला सुरवातीला जसा अल्प प्रतिसाद मिळाला तिच परिस्थिती कायम आहे. 

भाडेकरूवर घरमालकाकडून लगेच विश्‍वास ठेवला जातो. त्याने दिलेली स्वतः विषयीची माहिती ग्राह्य धरली जाते. पण तो भाडेकरू नेमका कोण? त्याच्या विषयीची त्याने दिलेली माहिती बरोबर आहे का? तो नेमका कोणता व्यवसाय अगर नोकरी करतो? या प्रश्‍नाबरोबर त्याची पार्श्‍वभूमी काय? तो जागेचा वापर कशासाठी करणार? हे तपासले जात नाही. पण हे काम ज्या त्या वेळेत आणि पोलिसांकडून झाले तर संभाव्य गुन्हे टळू शकतात. हाच धागा पकडून घरमालकांनी भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र मोजकेच घरमालक सोडले तर इतरांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक जण भाडेकरूनची सरकारी दप्तरी नोंद होऊन त्या पटीत घरफाळा वाढेल या भितीने माहिती देत नसल्याचे चित्र आहे. 

ृदृष्टीक्षेपात... 
*शहरात मिळकतीचे प्रमाण असे : 
*एकूण मिळकती - 1 लाख 43 हजार 
*रहिवासी - 1 लाख 23 हजार 
*व्यवसायिक - 20 हजार 

भाडेकरूंची अशी माहिती द्या 
* घरमालकासह भाडेकरूची, मोबाईल क्रमांक * भाड्याने द्यावयाची मिळकतीचा पत्ता 
*भाडेकरूचे मूळ गाव *एजंट, मध्यस्थीची माहिती 
*भाडेकरूच्या ओळखीच्या दोन व्यक्तींची माहिती 
* आधारकार्ड, फोटो 

पोलीस ठाण्यातील 
प्राप्त माहितीचे स्वरूप... 
*जुना राजवाडा - 52 
*शाहूपुरी - 37 
*लक्ष्मीपुरी - 67 
*राजारामपुरी - 53 
*करवीर - 97 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT