How to live, where to bring money for agriculture? 
पश्चिम महाराष्ट्र

गावगाडा रुतला : जगायचे कसे, शेतीला पैसे आणायचे कुठून ?

शामराव गावडे

नवेखेड  : "कोरोना' चा प्रसार व त्यातून झालेली लॉकडाऊनची स्थिती याचा फटका बोरगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील शेतकरी व उद्योगांना बसला आहे. त्यानी कुटुंबासाठी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. इथून पुढे कसे जगायचे, शेतीला पैसे कुठून आणायचे ? असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. 

कृष्णाकाठावरील बोरगाव. कृषी-औद्योगिक क्रांती करणारी गावे कृष्णाकाठावरील अनेक पट्टीचे शेतकरी या भागात आहेत. अलीकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात शेतीत सक्रिय झाली आहे. एकरी शंभर टन उसाबरोबर भाजीपाला, इतर पिके घेण्यात शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. लॉकडाऊनमुळे व्यापार थांबल्याने कवडीमोल दराने भाजीपाला विकावा लागला. काहींनी उभ्या पिकांत नांगर घातले. दुधाचा दर उतरल्याने दूध उत्पादक व व्यावसायिक अडचणीत आलेत. छोटी मोठी दुकाने बंद राहिल्याने अवलंबून असणाऱ्यांचे हाल झालेत. 

या भागातील मोठी असणारी बाजारपेठ बंद राहिल्याने लाखोंचा तोटा या व्यापाऱ्यांना सहन करावा लागला. ठिकठिकाणी झालेली सिंचनाची सोय, यातून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढलेला कल त्यातून होणारी अर्थप्राप्ती व्यवसायामधून मिळणारा नफा त्यातून पाहिलेली स्वप्ने सध्या स्वप्नेच राहिलीत. 

दोन महिने झाले तरी भारतात लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे शेतमालाला उठाव नाही. मार्केट बंद आहे. शेतकऱ्यांना डोके धरून बसायची वेळ आली. महापुरातील सावरलेल्या शेतकऱ्यांनी मिरची, भोपळा, फुलांची लागवड केली होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पिकांना चांगला दर मिळतो. हा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव. तो "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकामाची चक्र थांबली. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली. मागील वर्षी महापूर व अतिवृष्टीने शेतकरी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. शासनाच्या मदतीतून काही जण सावरत असतानाच "कोरोना' च्या तडाख्याने पुन्हा तो आडवा झाला. पतसंस्था, बॅंकांच्या वसुलीवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. 

प्रत्येक कुटुंबात सदस्य संख्या वाढल्याने शेतातील कामे सकाळी व संध्याकाळी हे सदस्यच मार्गी लावत असल्याने मजूरांची कामे सध्या कमी झालीत. ग्रामपंचायतीमार्फत होणारी विकासकामे बंद आहेत. वाहतूक बंद झाल्याने छोट्या मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची अडचण झाली आहे. एकूणच लॉकडाऊनमुळे गाव गाडा ठप्प झाला. तर विकासाचा रथही रुतला आहे. 

कर्जाऐवजी आर्थिक मदतीचा विचार करावा

लॉकडाऊनमुळे झालेल्या भाजीपाला व इतर पिकांच्या नुकसानीचा विचार करून शेतकऱ्याची कर्जे माफ करावीत. छोट्या व्यावसायिकांना कर्जाऐवजी आर्थिक मदतीचा विचार सरकारने करावा. तरच हा गावगाडा रुळावर येण्यास मदत होईल.

- माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT