hubli bomb blast shiv sena mla prakash abitkar reaction
hubli bomb blast shiv sena mla prakash abitkar reaction 
पश्चिम महाराष्ट्र

'हुबळी स्फोटातून माझ्या बदनामीचा प्रयत्न'; आबिटकरांची प्रतिक्रिया 

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : हुबळी रेल्वे स्ठानकावर झालेल्या बॉम्बस्फोटात कोल्हापुरातील राधानगरी भुदरगडचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज आमदार आबिटकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. 

काय म्हणाले आबिटकर?
भेट घेतल्यानंतर प्रकाश आबिटकर म्हणाले, 'हुबळी स्फोटाची सखोल चौकशी करा, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे. त्यात विनाकारण आपलं नाव कोणीतरी गुंतवलं आहे. यामागे मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर पोलीस या प्रकरणाचा लवकरच छडा लावतील, अशी मला अपेक्षा आहे.' ते म्हणाले, 'टीव्ही वाहिन्यांवर माझ्या नावा संदर्भात सातत्याने बातम्या दिल्या जात आहे. आज, वृत्तपत्रातही माझ्या नावासह बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे मी आज, येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.'

काय आहे प्रकरण?
तमीळनाडूतून आलेल्या एका पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकावर स्फोट झाला. त्या पार्सलमधील बकेटवर कोल्हापूरच्या राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या स्फोटाच्या कोल्हापूर कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश आबिटकर यांनी कालच या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. याप्रकरणी आमदार आबिटकर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आबिटकर यांनीदेखील कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक काळात हा प्रकार घडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी लघू शंकेस गेलेल्या एका व्यक्तीने अज्ञान वस्तूला लाथ मारल्यानंतर त्याचा स्फोट झाला होता. यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. उजळाईवाडी पुलाखालील ही घटना आणि हुबळीच्या घटनेत साम्य असल्याने कोल्हापुरातील पोलिसांचे एक पथक हुबळीला पाठवण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT