पश्चिम महाराष्ट्र

पत्नीला धक्का... अन्‌ एका चिठ्ठीने उलगडले नवऱ्याचे पूर्वायुष्य

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील 18 वर्षीय तरुणीची फेसबुकवरुन एका 33 वर्षीय व्यक्‍तीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत अन्‌ त्यानंतर प्रेमात झाले. काही महिन्यांनी दोघांनी घरातून पळून जाऊन गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील न्यायालयात रजिस्टर विवाह केला. दोघेही भरतपूर (उत्तर प्रदेश) येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. मात्र, एकेदिवशी खोली स्वच्छ करताना लहान मुलाच्या जन्माचा दाखला सापडला आणि पतीच्या पहिल्या विवाहाचे बिंग फुटले. त्यानंतर त्या तरुणीने सोलापुरातील सदर बझार पोलिसांत सासरच्यांविरुध्द फिर्याद दिली. 

हार्डवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या धिरेंद्रसिंह विजयसिंग चौधरी याने काही महिन्यांपूर्वी सोलापुरातील एका तरुणीशी मैत्री केली. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. रजिस्टर विवाहानंतरही धिरेंद्रसिंह ने पत्नीला घरी नेले नाही. दोघेही दोन-अडीच वर्षे भरतपूर (उत्तर प्रदेश) येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यानंतर दिर लोकेंद्रसिंह व सासू राजवती चौधरी त्याठिकाणी काही महिने राहण्यास आले. 
दरम्यान, भाड्याच्या घरात राहत असताना एकेदिवशी पत्नी घराची साफसफाई करत होती. त्यावेळी तिला लहान मुलाच्या जन्माचा दाखला सापडला. त्यानंतर तिने घरातील व्यक्‍तींना त्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी काहीच सांगितले नाही. तरीही त्या तरुणीने विचारणा सुरुच ठेवली आणि दिर लोकेंद्रसिंह याने सांगितले की, धिरेंद्रसिंह याचा पहिला विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. त्यानंतर संशयित आरोपींनी तिला चार-सहा महिने व्यवस्थीत नांदवले. मात्र, त्यानंतर तुझा विवाह स्वस्तात झाल्याचे म्हणत माहेरुन पैसे व सोने आणण्याची मागणी करीत छळ सुरु केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

घटस्फोट घेण्यावरून सुरु केला छळ 
संशयित आरोपी धिरेंद्रसिंह याच्यापासून त्या तरुणीला मुलगी झाली. त्यानंतर पती, सासू व दिराने माहेरून एक लाख रुपये आणि पाच तोळे सोने आण नाहीतर घटस्फोट घे, असे म्हणत छळ सुरु केला. पळून जाऊन लग्न केल्याने माहेरुन काहीच आणता येणार नाही, याची जाणीव झाल्याने त्या तरुणीने सदर बझार पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुध्द फिर्याद दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rainfall Prediction: पुणे, सातारा अन् कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट'!

Malegaon News : शेतीमध्ये अधुनिक टेक्नॉलॉजीसाठी अजित पवारांचे धोरणात्मक निर्णय

Ganpati Visarjan : पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण

Ganesh Chaturthi 2025: गणोशोत्सवात गोडधोड खाऊनही स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Latest Maharashtra News Updates : नागपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT