पश्चिम महाराष्ट्र

कृष्णा खोऱ्यातील पाणी वाटपाच्या समन्वयासाठी महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यात 2008-9 ते 2018-19 या कालावधीत वापरासाठी मिळालेल्या पाण्याची तंतोतंत व अचूक माहिती सादर करण्यासाठी पुण्याच्या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या तिन्ही राज्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अंमलबजावणी मंडळाला महाराष्ट्राची माहिती सादर करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

कृष्णा खोऱ्यातील वार्षिक पाणी वापर निश्‍चित करण्यासाठी गठित केलेल्या या समितीत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते, नाशिक येथील आधारसामग्री संकलन नियोजन व जलविज्ञान मंडळाचे अधीक्षक अभियंता, नाशिक येथील आधारसामग्री प्रकरण मंडळाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. पुण्यातील कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्षाचे अधीक्षक अभियंता या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. पुण्यातील मुख्य अभियंता (वि. प्र.) हे या समितीचे सहअध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. 

कृष्णा खोऱ्यातील पूर्ण आणि बांधकामाधीन असलेले मोठे प्रकल्प, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजनांचा प्रत्यक्ष पाणीवापर अंतिम करण्यासाठी दर सहा महिन्यांनी या समितीची आढावा बैठक होणार आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाने दिलेले निर्णय, आदेश, निर्देशाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत आढावा घेणे, कृष्णा पाणी तंटा लवाद कक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळ दरम्यान माहितीची देवाण-घेवाण करणे व समन्वय राखणे ही जबाबदारी या समितीवर असणार आहे. 

प्रकल्पांचा वार्षिक प्रत्यक्ष पाणीवापर अंतिम करून कृष्णा खोरे विकास महामंडळाला शिफारशीसह सादर करणे, महाराष्ट्राच्या केंद्रीय जल आयोगाच्या अखत्यारीतील सरितामापण केंद्राद्वारे संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे कृष्णा नदी मधून कर्नाटक राज्यामध्ये दरवर्षी वाहून गेलेल्या पाण्याचे परिमाण निश्‍चित करण्याचीही जबाबदारी या समितीवर असणार आहे. कृष्णा खोऱ्यातील ठोक 585 अ. घ. फू. पाणी महाराष्ट्राला वापरास लवादाने परवानगी दिली आहे. या मर्यादित इष्टतम वापर होईल यासाठी समितीच्या बैठकीमध्ये नियोजन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT