पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा'!

सकाऴ वृत्तसेवा

शहराची बारामती करण्याच्या घोषणा करून सत्ता मिळवली आणि नंतर बारामती विसरुन गेले. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानी व बालनेता म्हणून ओळख असणार्‍या शहाजी पाटील यांनी शहराच्या विकासकामावर बोलू नये.

इस्लामपूर (सांगली) : साडेचार वर्षात शहर विकासासाठी ११५ कोटीहून अधिक निधी विकास आघाडी व शिवसेनेने आणला. त्यांनी सत्तेत असताना ३१ वर्ष खोटे बोलून दाखवलेली स्वप्ने आम्ही पुर्ण केली. जरा घराबाहेर येऊन शहरात फिरल्यावर त्यांना समजेल. मनमानी व दंडुकशाही कारभार चव्हाट्यावर आल्याने विरोधक बदनाम झालेत. यामुळेच चुकीची विधाने करुन दिशाभूल करण्याचा त्यांचा असफल प्रयत्न सुरू आहे. ३१ वर्षे नगरपालिका सत्ता, सप्तपदी आमदारपद असूनही शहरातील विकासकामाची बोंब ठोकणे म्हणजे या 'चोराच्या उलट्या बोंबा' आहेत, असा पलटवार विकास आघाडीचे उपाध्यक्ष व नगरसेवक वैभव पवार यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. (In Islampur, vikas aghadi and shiv sena have brought more than Rs 115 crore for the development of the city in four and a half years)

राष्ट्रवादीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत सत्ताधारी गटाच्या कामकाज पद्धतीवर आक्षेप घेतला होता, त्याला श्री. पवार यांनी उत्तर दिले. वैभव पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्ष निशिकांत पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सभागृह पारदर्शी चालविले आहे. सलग ३१ वर्षे शहरावर सत्ता अबाधित ठेवणार्‍या राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकारी व सप्तपदी आमदार म्हणून निवडून येणार्‍या नेतृत्वाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम केले असते तर एकही विकासाचे काम शिल्लक राहिले नसते. शहराची बारामती करण्याच्या घोषणा करून सत्ता मिळवली आणि नंतर बारामती विसरुन गेले. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानी व बालनेता म्हणून ओळख असणार्‍या शहाजी पाटील यांनी शहराच्या विकासकामावर बोलू नये. मिळालेल्या सत्तेचा वापर स्वहितासाठी केला. मोठया इमारती कवडीमोलदराने भाडेतत्वावर घेऊन नगरपालिकेचा अर्थिक तोटा केला. लवकरच अशा अनेक गोष्टी आम्ही प्रकाशात आणू. स्टंटबाजीसाठी व शहरवासियांची दिशाभूल करण्यासाठी आरोप करू नका."

त्यांनी म्हटले आहे, भुयारी गटरचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच विरोध करुन थांबविले. १५ कोटीच्या निधीबाबत बोलविलेली सभा रद्द करण्याबाबत त्यांनीच पत्र दिले. गेल्या दिड वर्षात मंत्री जयंत पाटील यांच्याकडून शहराच्या विकासकामासाठी किती निधी आणला हे पुराव्यासह दाखवावे. त्यांच्या सत्ताकाळातील कारभार चव्हाट्यावर आल्याने ते बदनाम झालेत. त्यामुळे दुसर्‍यावर खोटे आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचा डाव साध्य होणार नाही. कोरोनाच्या संकटात आपण व आपल्या सप्तपदी आमदारांनी ठोस काय केले ते दाखवावे."

'त्यांनी' पावित्र्यावर बोलू नये!

सभागृहाच्या पावित्र्यावर स्वतःला अकार्यक्षम समजणाऱ्या शहाजी पाटील यांनी व महिला मुख्याधिकारीच्या अंगावर खुर्ची घेऊन धावून जाणाऱ्या खंडेराव जाधव यांनी बोलू नये. शहरातील लोकांना आपली चांगली ओळख आहे. काहींच्या दहशतीमुळे योग्य लोकांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीने त्यांना संधी द्यावी. विकृत विचाराचे राजकारण शहरवासीय चालू देणार नाहीत, असेही पवार यांनी म्हटले आहे. (In Islampur, vikas aghadi and shiv sena have brought more than Rs 115 crore for the development of the city in four and a half years)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT