jawari Bhakri 
पश्चिम महाराष्ट्र

चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खाल्ली तर...?

रवीकुमार सनोळे

सोन्याळ (सांगली)  - गेल्या अनेक वर्षांपासून जत तालुक्‍यात ज्वारीचा धान्य बाजार तेजीत दिसून येतो. गव्हापेक्षा ज्वारीचे भाव वाढले आहेत. परिणामी हॉटेलमध्येसुद्धा चपातीपेक्षा भाकरी महाग आहे.  धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत आहाराला अतिमहत्त्व आले आहे. त्यातही मधुमेहींनाही आता चपातीऐवजी भाकरी खायची सवलत दिल्याचेही परिणाम दिसत आहेत. 

भाकरची जागा चपातीने कशी घेतली ?

बैठ्या कामाच्या जीवनशैलीमुळे पचनक्रियेचे विकार वाढले आहेत. त्यांच्यासाठी चपाती पचवणे अवघडच. त्यातही मधुमेहींना भाकरी नको, असे प्रारंभपासून सांगितले जायचे. त्यामुळे गेल्या काही वर्षात चपाती महाराष्ट्रीयन मंडळीच्या आहारातून कमी होत गेली. सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने ऊस लागवड वाढली. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातून ज्वारी कमी होत गेली. आता ज्वारीचा भाव चांगलाच वधारला आहे. सर्वसामान्यांची कष्टाची भाकर महाग झाली आहे. 
यंदा दुष्काळ आणि चालू वर्षी अतिवृष्टीमुळे आणि इतर विविध कारणांमुळे ज्वारीचे उत्पादन कमीझाल्याने आणि रेशनवर गहू मोठ्या  प्रमाणात मिळत असल्याने ग्रामीण भागातही चुलीवर सर्रास चपाती दिसत आहे. ज्वारीच्या उत्पादनात गेल्या काही वर्षात सातत्याने घटच होत आहे.

ज्वारी आरोग्यवर्धक

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ॲसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज चपातीपेक्षा भाकरीच पचन चांगले होते. बद्धकोष्ठता, पित्तविकार, मूतखडा अशा रुग्णांना भाकरीचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. आता त्यात मधुमेहींचीही भर पडली आहे.

ज्‍वारी दर चढाच

ज्‍वारीच्‍या घटत्‍या उत्‍पादनामुळे गेल्‍या काही वर्षांत गव्‍हापेक्षा ज्‍वारीचे दर चढेच राहिले आहेत. सध्‍या ज्‍वारी ४० ते ४५ रुपये प्रति किलो तर गहू २५ ते ३५ रुपये या दराने किरकोळ बाजारात उपलब्‍ध आहेत. हॉटेल्‍समध्‍येही रोटी व चपातीपेक्षा भाकरीला जास्‍तीचा दर लावला जातो. भाकरी करताना चपातीपेक्षा अधिक कौशल्‍य लागते, असे हॉटेलचालकांचे मत आहे

भाकरीतील शर्करेचे प्रमाण चपातीपेक्षा फार अधिक आहे, असे नाही. पचनाच्या विकारांमुळे आणि ज्यांची शर्करा तुलनेने कमी आहे, अशा रुग्णांना आम्ही भाकरीची सवलत देतो; मात्र भात आणि भाकरीपैकी एकच निवडावे, असा आग्रह असतो. आहारात फळे,भाजीपाला वाढवणे हेच अधिक योग्य आहे.
- डॉ. कपिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT