पश्चिम महाराष्ट्र

उपसा सिंचन योजनाही कर्जमाफीत ?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्जमाफ करताना उपसा सिंचन योजनांवरील कर्जांना कर्जमाफी मिळत नाही.कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांना ऊस बिलातून सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीत या सहकारी उपसा सिंचन योजनांचाही समावेश करावी, अशी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केली. या विषयासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सहकार मंत्री जयंत पाटील यांचेकडे त्यांनी लेखी स्वरुपात मागणीही केली आहे.

नागपुर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यावरील चर्चेच्यावेळी घेण्यात आलेल्या सहकार,पणन,सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा विभागाच्या मागण्यांवर बोलताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी शासनाकडे काही मागण्या केल्या. यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शासन येत्या काही दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना देणाऱ्या कर्जमाफीच्या महत्वाच्या विषयामध्ये ग्रामीण व डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखान्यांनी कर्ज घेवून उभारलेल्या सह.जलसिंचन योजनांनाही विशेष बाब म्हणून कर्जमाफी मिळावी अशी विशेष मागणी केली. 

ग्रामीण, डोंगरी भागातील लहान मोठया शेतकऱ्यांना शेतीकरीता उपसा जलसिंचन योजना उभ्या करण्याकरीता सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बॅंकानी कर्ज दिले नाही. या योजनांसाठी सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेवून कारखान्याच्या नावांवर जिल्हा मध्यवर्ती बॅंकाचे कर्ज घेतले. उपसा जलसिंचन योजना उभ्या केल्या आहेत, अशा सहउपसा जलसिंचन योजनांच्या कर्जाची नोंद कारखान्याच्या दफ्तरी आहे. 

मात्र, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करताना उपसा सिंचन योजनांच्या कर्जांचा माफीत समावेश होत नाही. कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांना ऊस बिलातून सोसावा लागत आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनांचा कर्जमाफीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT