पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर पालिका सभेत भुयारी गटर योजनेच्या कामांस मंजूरी

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या भुयारी गटर योजनेच्या एसटीपीच्या कामांना आजच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी समितीच्या माध्यमातून निर्णयाचे अधिकार समितीला देण्याचे ठरले. सभेतील वर्तन, भाषा, कायदा आणि अधिकार या विषयांवर सभेत गंभीर चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर आणि समन्वयाच्या आवाहनाने सभागृह काही काळ गंभीर बनले.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत सभा झाली. लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन आवश्यक ठिकाणी योग्य त्या तडजोडी करता याव्यात तसेच ही योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी समिती करण्याचा निर्णय झाला. पूर्वीचा रस्तेप्रकल्प दुरुस्त करण्याचे ठरले. मंजूर विकास आराखड्यातील सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या उंच पाण्याच्या टाक्यांची जागा भूसंपादन करून घेण्यावर चर्चा झाली. ताकारी रस्ता ते बहे रस्त्यास जोडणाऱ्या  उपनगराध्यक्ष दादासो पाटील, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, संजय कोरे, आनंदराव पवार, शकील सय्यद, सतीश महाडिक, अमित ओसवाल, आनंदराव मलगुंडे यांनी चर्चेत भाग घेतला.

मुख्याधिकाऱ्यांच्या कानपिचक्या
एखाद्या कामावर उलट-सुलट चर्चा करून शेवटी काहीच मार्ग न निघण्याचा यापूर्वीचा अनुभव विचारात घेता बैठकीच्या सुरवातीलाच मुख्याधिकारी झिंजाड यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. आमची सत्ता आहे, अमुक करू, तमुक करू, असे केले तर कसे होईल? असे न करता सर्वांनी राजकारण बाजूला सारून शहराच्या हितासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. तरीही समिती गठीत करण्यावरून विक्रम पाटील यांनी सुरवातीला आक्षेप घेतलेच. त्यावरही झिंजाड यांनी 'तुम्हाला ताणायचे असेल तर ताणा' असा संताप व्यक्त केला.

सभागृहाची बिघडली शिस्त!
एसटीपी जागेवरून जी चर्चा झाली त्या पद्धतीला आक्षेप घेत संजय कोरे यांनी सभागृहाची शिस्त कालबाह्य झाल्याचा आरोप केला. चर्चेतील काही मुद्दे संशयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले. खंडेराव जाधव यांनीही सभागृहातील चर्चेवरून बाहेर होणारी चर्चा मांडली शिवाय नागरिक आपल्याविषयी काय समज करून घेतात याचेही अनुभव सांगितले. जागा बदलण्याच्या मुद्यावर नगराध्यक्ष-पक्षप्रतोद पाटील यांच्यात बाचाबाची झाली. 'मला सगळं माहितीय, सभागृहात बोलायला लावू नको' असे म्हणत नगराध्यक्षांनी त्यावर पडदा टाकला.

निलंबित करण्याचा इशारा...
नगराध्यक्षांनी सभेचे नियम न पाळणाऱ्यांना निलंबित करेन, असा इशारा दिला. यानंतर प्रत्येकाला बोलायला वेळ दिली जाईल, सभेआधी बैठक होईल, ओरडून बोलणे चालणार नाही; अन्यथा मला कायद्याने दिलेले अधिकार वापरावे लागतील, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT