jayant Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Jayanat Patil ED Enquiry: राष्ट्रवादीचा ईडी पॅटर्न ! जयंत पाटलांच्या कारवाईविरुद्ध इस्लामपूर भागातील कार्यकर्ते मुंबईत दाखल..

सक्तवसुली संचालनालयाने जयंत पाटील यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. ईडीने नोटीस देऊन जयंतरावांची बदनामी चालविली असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (ता. २२) ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईत आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यासाठी ते आज रवाना झाले. सांगलीसह इस्लामपूर भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेले आहेत.

सक्तवसुली संचालनालयाने जयंत पाटील यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. ईडीने नोटीस देऊन जयंतरावांची बदनामी चालविली असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्याविरोधात आंदोलनाची तयारी केली आहे. सांगलीत पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. कार्यकर्त्यांनी शहर-जिल्हा कार्यालयाजवळ जमावे, असे आवाहन शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केले.

बजाज यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की ईडीची कारवाई सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर होत आहे. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर जयंत पाटील यांच्यावर कारवाई सुरू आहे. संजय राऊत व अनिल देशमुख प्रकरणात न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. विद्यमान सरकारच्या २०१४ ते २०२२ या काळात ईडीने १२१ राजकीय नेत्यांविरोधात कारवाई केली. त्यापैकी ९५ टक्के, म्हणजेच ११५ नेत्यांवरील खटले हे विरोधी पक्षांतील नेत्यांच्या संदर्भातील आहेत.

मोदी सरकारच्या काळात कारवाया लक्षणीय वाढल्या असून विरोधकांना टार्गेट करणे हेच उद्दिष्ट आहे. सूडबुद्धीने हे सुरू आहे. नंतर काहींना ‘पावन’ करून पक्षात घेतले गेले आहे. ज्यांना निष्कारण छापेमारी करून सतावण्यात आले, त्यांच्या बदनामीची भरपाई कशी करणार, असा सवाल या आंदोलनातून विचारला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT