पश्चिम महाराष्ट्र

कोरोना रुग्णांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलणार?

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या (covid-19 patients) जीवाशी खेळले जाते, भरमसाठ बिले करून लूट केली जाते, त्या हॉस्पिटलांच्याबाबत प्रशासन कोणती पाऊले उचलणार? असा सवाल करत जिल्ह्याचे (sangli district) पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना झापले. संबंधितांवर त्वरित कारवाईच्या सूचना दिल्या.

येथील तहसिल कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. आमदार मानसिंग नाईक, काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, अँड. चिमन डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उपसभापती नेताजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसिलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक नरसिंह देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, 'लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने वस्तूस्थितीची तपासणी करून कडक पाऊले उचलावीत. कोरोनाग्रस्त लहान मुलांच्यासाठी छोटे कोविड सेंटर (covid care center for child) सुरू करावे लागेल. प्रशासनाने यासाठी तालुक्यातील लहान मुलांच्या डॉक्टरांची बैठक घेवून चर्चा करावी. आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयास इस्लामपूरप्रमाणे अद्यावत रुग्णवाहिका देण्यात येईल.'

गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे तालुक्याचा आढावा मांडताना म्हणाले, 'सध्या तालुक्यामध्ये २३७९ कोरोना रुग्ण आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर (death rate) ३. ६५ टक्के इतका आहे तर बरे होणारा आकडा ७५.६९ टक्के इतका आहे. ४५ वर्षावरील व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण (corona vaccination drive) सुरु आहे. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांची नोंद आपल्याकडे येते; मात्र त्यांच्या सहवासातील संशयित रुग्णांची नोंद आपल्याकडे आहे का?'

शहाजी पाटील यांनी शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या विचारली. किती आहे ? त्यावर केलेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले. माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका व शववाहिकेची मागणी केली. अरुण कांबळे यांनी शहरातील हॉस्पिटलमधील विदारक परिस्थिती असून त्याची चौकशीची मागणी केली. तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, डॉ.अशोक शेंडे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील, खंडेराव जाधव, विराज शिंदे, संग्राम फडतरे, विश्वनाथ डांगे,पं.स. सदस्य आनंदराव पाटील, संदीप पाटील, पिरअली पुणेकर, आयुब हवालदार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT