jayant patil political News 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? बॅनरवरून नेत्यांचे फोटो गायब, जयंत पाटील नाराज

.... त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

.... त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून पुन्हा एकदा राज्यात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजीनाट्य सुरू झाल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्रीपद आणि आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदापासून माजी मंत्री जयंत पाटील यांना दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जयंत पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. 18 जुलैला प्रतीक पाटील यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवरील शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो नसल्याने राष्ट्रवादीत नक्की काय चालले आहे. जयंत पाटील नाराज आहेत का?, शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादीतही काही स्थित्यंतरे होणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

जयंत पाटील यांचे चिरंजिव प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसाचे बॅनर सांगली जिल्ह्यात लावले जात आहेत. मात्र या बॅनरवर ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो व नावे नाहीत. त्यामुळे जयंत पाटलांच्या समर्थकांत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

फलकांवरून फोटो गायब करून नाराजी व्यक्त करण्याचा हा सांगली पॅटर्नतर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. की राज्यातील पक्षांतराचे वारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शिरते आहे का? यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. सांगलीतीलच आणखी एक नेते रोहित पाटील यांच्या अभिनंदन फलकावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फोटो गायब होते. रोहित पाटील हे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजिव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Law: पगार, भत्ते आणि ग्रॅच्युइटी आता नवीन कामगार संहितेत कशी मोजली जाणार? कामगार मंत्रालयाकडून मसुदा नियम जाहीर

Viral Video: अरे व्वा! शिक्षकाने स्वतःच्या पैशांनी मुलांना दिला विमान प्रवासाचा अनुभव, व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अंधेरीत मनसेला मोठे खिंडार

SCROLL FOR NEXT