Uday Samant
Uday Samant esakal
पश्चिम महाराष्ट्र

'कोल्हापुरात जयश्री जाधवांचा विजय ही काळ्या दगडावरील पांढरी रेष'

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कोकणात उभारल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पावरून वावड्या उटवल्या जात आहेत.

कऱ्हाड (सातारा) : तीन लाखाऐवजी भाजपचे (BJP) सहा लाख कार्यकर्ते आले, तरी कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तीन लाख मतदारांसाठी तीन लाख कार्यकर्ते येतील, असं केलेल्या वक्तव्यावर मंत्री सांमत यांनी विजय आमचाच होईल, ही काळ्या दगडावरील रेष आहे, अशी खात्री मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कऱ्हाडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला नॅकचा 'ए' प्लस मानांकन मिळालंय. त्याबद्दल येथील प्रचार्य के. बी. बुराडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदनासाठी मंत्री सामंत इथं आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री सामंत यांनी दिल्लीतील जुने महाराष्ट्र सदन काही दिवसांत उच्च शिक्षण विभागाच्या ताब्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्याला तत्वतः मान्याता दिलीय. दिल्लीला युपीएससीच्या अभ्यासासाठी जाणाऱ्या राज्यातील 100 मुलांच्या राहण्याची मोफत व्यवस्था त्या सदनात केली जाणार आहे, अशी घोषणा केली. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या सरकारला डळमळीत करण्याचा भाजप परोपरिनं प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय. तीन लाख मतदारांसाठी सहा लाख कार्यकर्ते आले, तरी कोल्हापुरात जयश्री जाधव यांचा विजय हाताच्या चिन्हावर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi Government) होणार हे निश्चित आहे. नाणार प्रकल्पाबाबत मंत्री सांमत म्हणाले, कोकणात उभारला जाणारा नाणार प्रकल्पावरून (Nanar Project) वावड्या उटवल्या जात आहे. तो रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. त्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही. त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही आवाहन त्यांनी केलं.

मंत्री सामंत पुढे म्हणाले, राज्यात कोठेही दौरा असला की, त्या जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयाला भेट देतोच. त्यामुळं तेथील स्थिती लक्षात येते. कऱ्हाडचे औषणनिर्माण शास्त्र नॅकचा ए प्लस मानांकन मिळवणारे राज्यातील पहिले शासकीय महाविद्यालय आहे. अत्यंत कष्टानं ते मानांकन मिळावलं आहे. त्यासाठी महाविद्यालयास भेटही देत आहोत. त्यांच्यासाठी इनोव्हेशन हॉल व मुलींचे वस्तीगृहाला मंजुरी दिली आहे. हॉलसाठी पाच कोटी व वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी देत आहोत. अद्ययावत ५० मुलींची सोय असलेले वसतीगृह असणार आहे. त्यासह हॉलही चांगल्या दर्जाचा असेल. अन्य शैक्षणिक कार्यक्रमांनाही तो हॉल भाड्यानं देण्याचा धोरणात्मक निर्णय येथे घेतला आहे. तो राज्यासाठी लागू केला आहे. त्यातून येणाऱ्या पैशातून हॉलची देखभाल दुरूस्ती होवू शकते. कऱ्हाडच्या महाविद्यालयातील एम फार्मच्या रिक्त जागाही भरत आहोत. पीजी अभ्याक्रम समितीलाही लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीजीच्या मानांकनात येथील विद्यार्थी चमकत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्यांना नॅकचं मानांकनही मिळालं आहे, असं त्यांनी कौतुक केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT