पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : अखंड वाहताेय माणुसकीचा झरा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या संचारबंदीचा परिणाम शहरातील दळणवळणावर झाला आहे. त्या स्थितीत काम करणाऱ्या आरोग्य, पोलिसांसह शिक्षणासाठी येथे आलेल्यांसाठी मात्र मेस बंद असल्याने हालपेष्टेतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात जेवणाची सोय उपब्ध व्हावी, यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. त्यांच्याकडून सेवा स्वरूपात अत्यंत अल्पदरात भाजी, चपाती व भात असे जेवण वितरीत केले जात आहे. त्यासाठी त्यांनी पालिका व पोलिसांचीही मदत मिळत आहे. 

येथील अक्षयपात्र पोळीभाजी केंद्रातर्फे संचारबंदीच्या काळात विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, गरजू लोकांसाठी घरपोच तयार देण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे. सगली स्थिती पुर्ववत होईपर्यंत सेवा सुरू राहणार आहे, असे केदार डोईफोडे यांनी सांगितले. पोळी एक नग दहा रूपये, त्यात पातळ भाजी किंवा ऊसळ 170 ग्रॅमची ऊस 20 रूपये आणि 140 ग्रॅमचा भात 15 रूपये असे जेवण पुरवण्यात येत आहे. त्या ऑर्डर पुर्वनोंदणी केल्यास देण्यात येणार आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑर्डर नोंदवल्या जातात. त्याचा शहरात पोच करण्यासाठी 20 तर मलकापूर किंवा विद्यानगरला पोच करण्यासाठी 30 रूपये घेतले जातात. 

रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना जेवण विनाशुल्क दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांची मेस बंद आहे त्याशिवाय जेष्ठ नागरिक ज्याना आवश्यकता आहे. हॉटेल बंद असल्यामुळे जेवण घरीच सर्व स्वच्छता बाळगून डिलिव्हरी सुद्धा सर्व सुरक्षा व सावधानता बाळगून केली जाईल. पोलीस, शासकीय वैद्यकीय सेवा व पत्रकारांसाठी त्यांच्या जागेवर पोच नाश्ता आणि जेवण मिळेल, अशी व्यवस्था ओकांर आपटे यांनी केली आहे. त्यांच्याकडे नाश्ता केवळ दहा रूपयात, जेवण 50 तर चहा पाच रूपयात उपलब्ध आहे. वाखाण भागातील मिसळ हाऊसमध्ये सकाळी 10 ते सहा वाजेपर्यंत ती सुविधा ओंकार आपटे यांनी उपलब्ध करून दिली आहे. 

Coronavirus : त्यांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आल्याने सातारकरांसह कऱ्हाडकरांना दिलासा 

येथील सावंत मेस यांच्यातर्फे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, गरजू लोकांसाठी. घरपोच सेवा उपलब्ध करूनदिली आहे. त्यात पोळी, पातळभाजी, भात असणार आहे. अत्यल्प दरात फुल डबा केवळ नव्वद रूपयात देण्यात येणार आहे. ऑर्डर पुर्वनोंदणी केल्यास भेटतील. त्याचे घपोच सेवेचे शुल्कही आकरले जाणार आहे.

घरपोच सेवा महत्वाच्या...

विद्यानगर भागात अनेक विद्यार्थ्यी मेस अभावी हालपेष्टा सहन करत आहेत. त्यांच्यासाठी या सुविधा अत्यंत महत्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे अनेकांची सोय झाली आहे. अत्यल्प दरात मिळणारे जेवण गरजेपुरते महत्वाचे ठरत आहे. त्याशिवाय बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना, आरोग्य सेवाकांनी त्यांच्या दवाखान्यात ती सेवा उपलब्ध झाली असल्याने त्यांच्याकडूनही या सेवेकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Coronavirus : ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्ट सरसावले; 50 लाखांचा निधी जमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का,जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT