पश्चिम महाराष्ट्र

वन विभागाचा कारभार म्हणजे... गरज सरो अन्‌ वैद्य मरो!

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - सैदापूर येथे खोडशी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आलेली मगर पकडण्यासाठी वन विभागाने स्थानिक शेतकऱ्यांकडून साहित्य घेऊन मोहीम फत्ते केली. पकडलेली मगर दुसऱ्या दिवशी सुरक्षित स्थळीही सोडण्यात आली. मात्र, मगर पकडण्यासाठी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना आठवडा उलटून गेला तरी वैरणीसह जनावरांचे दिलेले दोर, पोती परत मिळण्याची प्रतीक्षा आहे. वारंवार मागणी करूनही साहित्य देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांना वन विभागाबद्दल नाराजी आहे.

शहरानजीकच्या सैदापूर येथे खोडशी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ता. १८ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास दोन मगरी दिसल्या. त्यानंतर संबंधित ठिकाणी वन विभागाला बोलावण्यात आले. वन्यजीवप्रेमी रोहन भाटे यांनी मगर पकडण्यासाठी पुढाकार घेत वन कर्मचाऱ्यांकडे मगर पकडण्यास दोरी, पोती आदी साहित्याची मागणी केली. त्यावेळी रिकाम्या हाताने आलेल्या वन कर्मचाऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांकडून साहित्याची जमवाजमव केली. त्यात काहींनी लगतच्या वस्तीवरील जनावरांच्या दोऱ्या, तर काहींनी वाहनाला वैरणीसाठी आणलेले दोर दिले. पोती, बॅटरी, काठ्या आदी साहित्याची जमावजमव करून शेतकऱ्यांनी मगर पकडण्याच्या मोहिमेला मदत केली.

त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास मगर पकडण्यात आली. त्यावेळी वन विभागाने मगरीला बांधलेले दोर, पोती सोबत घेऊन गेले. शेतकऱ्यांना बॅटरी परत केली. पकडलेली मगर दुसऱ्या दिवशी मायक्रोचीप बसवून सुरक्षितस्थळी सोडण्यात आली. या घटनेला आठवडा उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या साहित्याची प्रतीक्षा आहे. त्या संदर्भात अनेकदा संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र ‘देतो’ असे उत्तर मिळत असून प्रत्यक्षात मात्र साहित्य परत देण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. या एकूणच प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून ‘गरज सरो अन्‌ वैद्य मरो’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मगर पकडण्यासाठी वन विभागाच्या लोकांनी साहित्य मागितल्यावर वैरणीसाठी वाहनाला असलेले दोर तातडीने दिले. मात्र, ते अद्याप परत मिळाले नाहीत. वन कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधला असता देतो, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे.
- संजय कदम, शेतकरी (सैदापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT