Maharashtra Ekikaran Samiti Devendra Fadnavis esakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : फडणवीसांविरोधात म.ए समिती आक्रमक; पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरली गळपट, धक्काबुक्की करत नेलं ठाण्यात

महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती.

मिलिंद देसाई

फडणवीस येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने टिळक चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) उमेदवारांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली असताना देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाल्यामुळं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.

यावेळी निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Karnataka Police) धक्काबुक्की केली असून आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळं मराठी भाषिक कार्यकर्त्यांत उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

तसेच समितीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगाव दाखल झाले आहेत.

फडणवीस येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने टिळक चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभेपर्यंत जाऊ दिलं नाही, तसंच अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून माघारी पाठविण्यात आलं. तर, अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळं मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT