पश्चिम महाराष्ट्र

महामस्तकभिषेक सोहळा परिसरातील 42 गावांसाठी पर्वणी

संजय खुळ

श्रवणबेळगोळ - बारा वर्षांनी होणारा भगवान बाहुबली महामस्तकभिषेक सोहळा परिसरातील 42 गावांसाठी मोठी पर्वणी ठरते. महोत्सव काळात 7 दिवस संपूर्ण गावांना या सोहळ्याचे निमंत्रण असते. या कालावधीत अनेक गावात चूलच पेठविले जात नाही.

दरम्यान महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर दुपारनंतर मूर्ती दर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात येत आहे. अष्टगंध ने व्यापलेली पूर्ण मूर्ती आणि त्यावरील विद्युत रोषणाई यामुळे दिसणारे अप्रतिम द्रुष्य पाहण्यास प्रचंड गर्दी होत आहे.रात्री 10 पर्यंत मूर्ती दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात येत आहे.

जगद्गुरू चारुकीर्ती महाराजांनी श्रवणबेळगोळचा विकास बरोबरपरिसराच्या विकासाला महत्व दिले आहे या महोत्सव निम्मिताने अनेक विकास कामे परिसरात होतात. या भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिक्षण याबाबत कामे केली जातात. महस्तकाभिषेक सोहळ्याचे या गावांना विशेष निमंत्रण असते.त्या मुळे सम्पुर्ण गावे या सोहळ्यात सहभागी झालेले असतात.या भागातील नागरिकांना येण्यासाठी  व जाण्यास मोफत बस सेवा सुरू असते.

धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो. सकाळी महोत्सवसाठी यायचे व रात्रीचा सांस्कृतिक  कार्यक्रम पाहून परत जायचे. हा दिनक्रम महोत्सव काळात असतो. सकाळ व संध्याकाळी जेवणासाठी सहकुटुंब या ठिकाणी ग्रामस्थ असतात, अशी माहिती महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी दिली.

दरम्यान, मस्तकाभिषेक सोहळ्यानंतर दिसणारे मूर्तीचे विहंगम द्रुष्य पाहण्यास प्रचंड गर्दी होत आहे. वेगवेगळ्या रंगाच्या  विद्युत झोताबरोबर मूर्तीचे द्रुष्य अनेकांना आकर्षण ठरत आहे.

बाहुबली महामस्तकाभिषेकाशी संबंधीत बातम्या व लेख- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT