Schools closed Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवा !

सिटीजन कौंन्सिलची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दिवसेंदिवस कोरोनाच्या (Corona)रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तरी देखील १७ पासून शाळा (School)सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवाव्यात, अशी मागणी सिटीजन कौंन्सिलतर्फे (Citizen Council) जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा क्रम चढता आहे. यामुळे बंगळूर येथील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. बेळगावला १७ पासून शाळा सुरु करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. यामुळे पालक संभ्रमात आहेत. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्याप कोरोना लस देण्यात आलेली नाही. त्यांना कोरोना इफेक्शन होऊ शकते. कित्तूर येथे अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. परिस्थिती अजून भयानक होऊ शकते. मुले शाळेला गेल्यानंतर एकाच रीक्षातून जाणार तसेच वर्गात देखील एकत्रच बसणार, सामाजिक अंतर पाळण्याच्या सुचना आपण त्यांना वारंवार करू शकत नाही. तसेच त्यांच्यावर मानसीक दबावही टाकू शकत नाही. हे टाळण्यासाठी शाळा बंद ठेवणे हाच एक पर्याय आहे. गेल्या वेळी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. यावेळीही ऑनलाईन शिक्षण सुरु करा.(School News)

बेळगावचे तापमान दिवसेंदिवस कमी होत आहे. थंडीमुळे देखील मुले आजारी पडत आहेत. यामुळे सध्य स्थितीत शाळा बंद ठेवणे हाच एक पर्याय आहे. येत्या पंधरा दिवसात थंडी देखील कमी होईल. यामुळे ३१ पर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, तुम्ही केलेल्या मागणीचा विचार करून यासंबंधी मुख्यमंत्री कार्यालयाशी तातडीने संपर्क साधण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी अध्यक्ष सतीश तेंडोलकर, विकास कलघटगी, सेवंतीभाई शहा, ॲड. एन. आर. लातुर, अरुण कुलकर्णी, राहूल पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT