kolhapur carrier federation protest on road.gif 
पश्चिम महाराष्ट्र

'त्याच्यासाठी' त्यांनी रस्त्यावरच केले जेवण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : खराब रस्त्यांच्या प्रश्‍नावरून जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज रस्त्यावरच खर्डा-भाकरी खाऊन प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

महिन्यापासून वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलन सुरू केले आहे. रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. मध्यंतरी महापालिकेला गाड्यांचा घेराओ घालून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले गेले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी, पुढे गंगावेसपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चप्पल लाईनचे व्यापारी धुळीने त्रस्त झाले आहेत. गंगावेसपर्यंत रस्त्याची अशीच स्थिती आहे. नववर्षाचे स्वागत होत असताना वाहनधारक महासंघाने मात्र खड्ड्याभोवती रांगोळी काढून, भोवती फुले टाकून आंदोलन केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, नीलेश हंकारे, राजू नागवेकर, भारत चव्हाण, पुष्पक पाटील, विनोद जाधव, अतुल भास्कर, दत्ता कोतमिरे, सोमेश ओतारी, प्रज्वल गवळी, गणेश डोईफोडे आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

Explained: तीन वर्षांत भारताचे तीन शेजारी पेटले! काय आहे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेतील अस्थिरतेची कहाणी? भारतावर काय परिणाम?

Beed News : अशोक थोरात यांचे निलंबन रद्द; राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक म्हणून दिली प्रतिनियुक्ती

Latest Marathi News Updates : शिवतीर्थावर राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये खलबतं

Ashwini Kedari : कलेक्टर होण्याचे स्वप्न राहिले अपूर्णच! पाळू येथील अश्‍विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT