Solar Panel 
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : सखूआबाचं घर अखेर प्रकाशमान; सतेज पाटलांच्या प्रयत्नातून पोहोचला सौरऊर्जा पॅनल

सकाळ डिजिटल टीम

सोळांकूर : गेली दहा वर्षे महावितरणचे उंबरे झिजवूनही महावितरणची वीज पोहचू शकली नाही. अंधारात प्रपंच चालवणाऱ्या सुळंबी,( ता.राधानगरी) येथील सखाराम तुकाराम पाटील यांच्या राहत्या घरात आमदार सतेज पाटील यांनी वाटप केलेल्या सौर ऊर्जेवरील दिव्याचा पहिल्यादाच प्रकाश पडल्यामुळे गेली दहा वर्षे अंधकारमय असणारे घर प्रकाशाने उजळले. तेही मुलाच्या लग्नदिवशीच हा त्यांच्या कुटुंबियासाठी दुग्धशर्करा योग होता.

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेत सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी विविध कारणांमुळे महावितरणची वीज आजपर्यंत पोहचू न शकल्यामुळे अंधारात रहावे लागत असलेल्या राधानगरी तालुक्यातील कुटूंबाचा सर्व्हे केला.

त्यानुसार सुळंबी येथील सखाराम तुकाराम पाटील यांच्या कुटूंबाची निवड करून त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य जे.के.पाटील यांच्या पुढाकाराने राधानगरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या हस्ते नुकतेच त्यांच्या घरी सौरऊर्जा पँनेल व बल्ब बसवण्यात आले.

यावेळी माजी सरपंच प्रा. वाय. एस. पाटील, रमेश पाटील, एन. डी. मोरे, एच.के. पाटील, उत्तम पाटील, कमलाकर पाटील, राजेंद्र पाटील,हेमंत मोरे, संदीप जाधव, विश्वास पाटील , अशोक पाटील,सखाराम पाटील व नव वर वधू उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT