पश्चिम महाराष्ट्र

कुटुंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोश: कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : मामाच्या गावी निपाणी येथे आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी विद्यार्थ्याचा(Kolhapur student)विहिरीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (ता. 8) सकाळी उघडकीस ही घटना आली. रणवीर दीपक सूर्यवंशी (वय 15 रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.kolhapur-student-died-in-nipani-crime-marathi-news

गेल्या महिन्यापूर्वी रणवीर हा आपले मामा सुभाष चव्हाण (साळुंखे गल्ली, निपाणी) यांच्या घरी आला होता. मंगळवारी (ता. 8) सकाळी तो आणि सुभाष यांचा मुलगा प्रथमेश यांच्यासमवेत घरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीमंत निपाणकर-सरकार वाड्यातील विहिरीवर (कुंडामध्ये) पोहोण्यासाठी गेले होते.

प्रथमेश व रणवीर हे दोघेजण इनरच्या साह्याने पोहू लागले. यावेळी रणवीर विहिरीत बुडाला. घाबरून प्रथमेशने घराकडे धाव घेत याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानुसार तातडीने चव्हाण परिवारांसह नगराध्यक्ष जयवंत भाटले, श्रीमंत दादाराजे देसाई-निपाणकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील शेलार यांच्यासह काही नगरसेवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी रणवीर हा पाण्यात खोल बुडाल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली. यावेळी घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्यासह हवालदार बसवराज नावी, एस. एस. चिकोडी, संदीप गाडीवड्डर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रणवीर हा खोलवर बुडाल्याचे लक्षात आले. त्यानुसार कोल्हापूर येथील जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. दुपारी कांबळे यांनी सुमारे शंभर फूट खोल विहिरीत बुडालेला रणवीर याचा मृतदेह बाहेर काढला. दुपारी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. निपाणी शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

कुटुंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोश

मयत रणवीर विहिरीत बुडाल्याने त्याची माहिती कुटुंबीयांसह अनेक नातलगांना समजली. त्यामुळे सर्वांनी विहिरीभोवती गर्दी केली होती. अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढल्यावर कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. हे दृश्य पाहून सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT