Belgaum Ring Road Highway Authority esakal
कोल्हापूर

Highway Authority : रिंगरोडसाठी होणार 1500 हून अधिक झाडांची कत्तल; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

बेळगाव (Belgaum) तालुक्यातील ३१ गावांमधून रिंगरोड होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

रिंगरोडविरोधात याचिका दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावे, असे आवाहन केले होते.

बेळगाव : रिंगरोडच्या (Ring Road) पहिल्या टप्प्यातील कामासाठी शिवारातील विविध प्रकारची पंधराशेहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. त्यासाठी शिवारात जाऊन प्रत्येक झाडावर (Tree) क्रमांक घातला जात आहे. शेतकऱ्यांचा विरोध असूनही महामार्ग प्राधिकरण काम पुढे रेटत असल्याचे चित्र आहे.

बेळगाव (Belgaum) तालुक्यातील ३१ गावांमधून रिंगरोड होणार आहे; मात्र रिंगरोडला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध होत आहे, तरीही महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. संबंधित कंत्राटदाराला वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वेक्षण केले जात आहेत.

तसेच शेतकऱ्यांना (Farmers) कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता झाडांवर क्रमांक घातले जात असून, याबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी विविध भागांत सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी माघारी पाठविले होते; मात्र पुन्हा एकदा जीपीएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच प्रत्येक गावातून जास्तीत जास्त याचिका दाखल व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त होत आहे.

रिंगरोडविरोधात याचिका दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावे, असे आवाहन केले होते; मात्र काही शेतकऱ्यांनीच याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण रिंगरोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते टाळण्यासाठी अधिक प्रमाणात याचिका दाखल होणे आवश्यक आहे.

-मनोहर किणेकर, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT