Shrishti Sunil Shinde
Shrishti Sunil Shinde esakal
कोल्हापूर

रात्रीचे ते वेदनादायी चार-पाच तास..; भटक्या कुत्र्याने पायाचा लचका तोडल्याने निष्पाप श्रृष्टीचा मृत्यू, मृतदेह थेट स्मशानभूमीत

लुमाकांत नलवडे

श्रृष्टीने पदवी पूर्ण करून ग्राफिक्स डिझाईनचा (Graphic Design) प्रोजेक्ट घेतला होता. त्या दिवशी ती शनिवार पेठेत गेली आणि भटक्या कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला.

कोल्हापूर : रात्री आम्ही खासगी रुग्‍णालयातून व्हेंटिलेटर (Ventilator) लावूनच श्रृष्टीला सीपीआरमध्ये दाखल केले. तेथून पुढे चार-पाच तास झाले आणि तिचा मृत्यू झाला. पाहिलेले आणि अनुभवले ते तास खूपच वेदनादायी होते. मरणाच्या खोलीत तिला बंद केल्याचे वाटत होते. मात्र, तेथे त्या उपचार पद्धतीला पर्याय नव्हता. सीपीआरमधील (CPR)कैद्याच्या वॉर्डच्या खाली असलेल्या खोलीत तिचा जीव गेला.

मृतदेह घरी न आणता थेट स्मशानभूमीत न्यावा लागला. या कुत्र्यांचा (Dog) काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, अशी तीव्र भावना श्रृष्टीचे नातेवाईक, मित्रमंडळींकडून येथे व्यक्त झाल्या. सोशल मीडियावरसुद्धा नाराजीच्या भावना व्यक्त झाल्या. एक हसतं खेळतं चौकोनी कुटुंब नागाळा पार्क परिसरात राहत होते. दोन मुली, वडील इलेक्ट्रिक काॅन्ट्रॅक्टर, आई गृहिणी. सर्व काही आनंदी चाललं होते.

श्रृष्टीने पदवी पूर्ण करून ग्राफिक्स डिझाईनचा (Graphic Design) प्रोजेक्ट घेतला होता. त्या दिवशी ती शनिवार पेठेत गेली आणि भटक्या कुत्र्याने तिच्या पायाचा चावा घेतला. तिच्यावर सीपीआरमध्ये तातडीचे उपचार झाले. पुढे तिचे नियमित आयुष्य सुरू झाले. ती वेळेवर रेबिज प्रतिबंधक लससुद्धा घेत होती. मात्र, शनिवारी ताप आला, पाय लुळे पडले आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. पाहता पाहता तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आणि रेबीज निष्पन्न होताच तिला सीपीआरमध्ये हलवावे लागले.

नातेवाईकांकडून सीपीआरमध्ये सायंकाळी साडेसातच्या सुमारास चौकशी सुरू झाली. तिला आणून कोठे ठेवायचे इथंपासून ते उपचार काय असणार इथंपर्यंतची माहिती घेतली जात होती. रेबीज झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात ठेवत नाहीत, म्हणून सीपीआरमध्ये दाखल करावेच लागले. रात्री अकराच्या सुमारास व्हेंटिलेटर लावलेल्या स्थितीत रुग्णवाहिका सीपीआरमध्ये थांबली होती. पीपीई कीट घालूनच सर्व उपचार करावे लागतात, त्यानुसार तिला संबंधित खोलीत ठेवले आणि बाहेरून कुलूप घातले. नातेवाईक बाहेर होते. रात्री उशिरा तिची प्राणज्योत मालवली. आज (ता. ५) सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत तिचे रक्षाविसर्जन आहे. संसर्ग नको म्हणून कुटुंबीयांनाही प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागली.

बाबा, मी परत येणार आहे...

जिद्दी आणि भविष्यात उज्ज्वल करिअरची संधी श्रृष्टीला मिळाली होती. प्रोजेक्ट हाती होते. भविष्यात मोठे होण्याचे तिचे स्वप्न आता कवेत येत होते. तिला जेव्हा खासगी रुग्णालयात नेले जात होते, तेव्हा ती तिच्या बाबांना मी परत येणार आहे... असे म्हणाली होती. मात्र, काळाला हे पाहवलं नाही. तिच्या उज्ज्वल करिअरच्या स्‍वप्नासह ती आता कायमचीच निघून गेली.

रेबिज झालेल्या रुग्णांकडून तो इतरांना होऊ नये म्हणून स्वतंत्र खोलीत ठेवावे लागते. तिची लाळ किंवा रक्त इतरांना लागल्यास त्याचा धोका इतरांना होऊ शकतो. म्हणून स्वतंत्र खोलीत ठेवावे लागते. जगभरातील अभ्यासानुसार ९९.०९ टक्के अशा व्यक्ती जिवंत राहत नाहीत. त्यामुळे पाळीव कुत्रा असणाऱ्यांनी स्वतःला आणि त्यालाही लसीकरण करावे. तीन फेब्रुवारीला ज्यांना कुत्र्याने चावा घेतला, त्यांनीही प्रकृती डॉक्टरांना दाखवावी.

-डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT