कोल्हापूर

'तिसऱ्या लाटेसाठी कृती आराखडा करा'

मुले, मुलींची संख्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने निश्चित करावी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्ग होईल याविषयी सध्या अंदाज आहेत. पण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी सज्ज रहावे. तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवारपर्यंत तयार करावा. असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात दिले. छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग तज्ज्ञांच्या (व्ही. सी) व्दारे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणत: जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येपैकी 18 वर्षाखालील युवक, युवतींची संख्या अंदाजे 10 लाख इतकी आहे. पालकमंत्री म्हणाले, या मुले, मुलींची संख्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने निश्चित करण्यात यावी. आरोग्य विभागाने गाफील न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेचे सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 200 आयसीयु बेड लागतील. याकरिता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अनुक्रमे 50 तर खाजगी रुग्णालयात 150 व्हेंटीलेटर बेड तालुकानिहाय निश्चित करण्यात येणार असून यामध्ये 10 ऑक्सीजन तर 2 व्हेंटीलेटर बेडचा समावेश असेल, असेही स्पष्ट करुन डॉक्टरर्सनी मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाहीतर आश्वस्त करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी ज्या ठिकाणी कोविड हॉस्पीटल्स आहेत, त्या ठिकाणी लहान मुलांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे. त्यासाठी लागणारी अत्यावश्यक लागणारी वैद्यकीय उपकरणेही रुग्णालयांनी तयार ठेवावीत. आवश्यकतेनुसार खरेदी करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. सीपीआर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर यांनी जिल्ह्यातील केवळ 5 टक्के बालकांना ऑक्सीजन तर 1 ते 2 टक्के मुलांना व्हेटींलेटर लागण्याची शक्यता या बैठकीत व्यक्त केली.

व्हीसीव्दारे पार पडलेल्या या बालरोग तज्ज्ञांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील इतर बालरोग तज्ज्ञांनी काही महत्वपूर्ण सूचना करताना उपचार पध्दतीमध्ये पालकांना येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे निरसन केले. या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील इतर मान्यवर बालरोग्य तज्ज्ञ व्ही. सी. व्दारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT