कोल्हापूर

जीव धोक्यात घालून स्वॅब तपासणी; 20 जणांची टीम करते काम

बहुतांश तरुणाईच या कामात व्यस्त होती.

संदीप खांडेकर

पीपीई किट घालून सुरक्षित असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होती. 20 कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

कोल्हापूर : "डॉक्‍टर, एक स्वॅब तपासणीसाठी किती वेळ लागतो?, एक प्रश्न, "किमान पाच तासांत स्वॅब पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कळते', कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड बोलत्या झाल्या. त्या स्वॅब तपासणीच्या (swab examination) रांगेकडे गेल्या. तरुणांची नाव नोंदणी सुरू होती. येथे स्वॅब (Swab) जमा करण्याचे काम जीवावर बेतणारे. एखाद्याचा स्वॅब पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हे माहीत नसताना तो कलेक्‍ट करणे सुरू होते. पीपीई किट घालून सुरक्षित असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होती. 20 कर्मचारी (20 people) येथे कार्यरत आहेत. बहुतांश तरुणाईच या कामात व्यस्त होती. (A team of 20 people is working for swab examination in kolhapur)

"चौथ्या मजल्यावरील मोलेक्‍युलर बायोलॉजिकल लॅबमधील डोफिंग रूममध्ये स्वॅब पाठविला जातो. तेथे पीपीई किट घालूनच प्रवेश करावा लागतो. तेथे स्वॅब ओपन करून रायबोन्युक्‍लिक ऍसिडचे (आरएनए) एक्‍स्ट्रॅक्‍शनचे काम सुरू असते, "डॉ. गायकवाड कामाची रूपरेषा सांगत होत्या. चौथ्या मजल्यावरील लॅबच्या प्रमुख डॉ. रोमा चौगुले. क्वालिटी मॅनेजर म्हणून डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तिथला कार्यभार. "लॅबमध्ये स्वॅब आल्यानंतर तो दोन छोट्या ट्यूबमध्ये ठेवला जातो. व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडियम सेपरेशनचे हे काम.

आरएनए एक्‍स्ट्रॅक्‍शनचे काम येथे होते. पुढे तो मशीनवर ऍम्प्लिफाय करून त्याचा ग्राफ काढला जातो. तेथेच स्वॅब पॉझिटिव्ह की निगेटिव्ह समजते, डॉ. सावंत यांनी माहिती दिली. "लॅबमध्ये किती कर्मचारी काम करतात?, यावर जरगनगरातल्या सुमन विनोद जांभळे व कसबा बावड्यातील राजश्री कृष्णात निर्मळ पुढे आल्या. दोघीही टेक्‍निशियन्स आहेत. राजश्री यांचं वय पन्नासहून अधिक, तर जांभळे वयाने त्रेचाळीसच्यावर आहे.

यावेळी निर्मळ म्हणाल्या, "मी चोवीस वर्षे टेक्‍निशियन्स म्हणून काम करते. वर्षभर लॅबमध्ये आहे. सुरुवातीला भीती वाटत होती. डॉ. संजय डी. पाटील यांनी धीर दिला. सुरक्षितपणे काम करण्याचे प्रशिक्षण दिले. घरी गेल्यावर ऍप्रन, चप्पल, कपडे सॅनिटाइझ करून अंघोळ करते. मगच घरातल्या इतर खोल्यांत वावरते. सासूबाई हिराबाई यांचे वय 90 हून अधिक आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. माहेर दुधाळी येथे आहे. आई-वडील वयस्कर आहेत. त्यांना भेटता येत नसल्याने मन कातरते.

"माझ्या सासूबाईंना संधिवात व ब्लड प्रेशरचा त्रास आहे. सासऱ्यांना लकवा मारला होता. मुलगी सिद्धी बारावी, तर किरण सातवीला आहे. पती सामाजिक कार्यात व्यस्त असून घरची कामे आटोपून लॅबमध्ये यावे लागते. जे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले. हॉस्पिटल प्रशासन पाठीशी खंबीर असल्याने कामात व्यस्त राहतो', असे सांगताना जांभळे यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.

25 हजारांवर स्वॅब तपासणी

आजपर्यंत येथील लॅबमधून 25 हजार 588 स्वॅब तपासले आहेत. आजही लॅबचे काम थांबलेले नाही. 10 टेक्‍निशियन्स, 4 डाटा ऑपरेटर्स, 20 कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

ही आहे टीम

लॅबमध्ये टेक्‍निशियन म्हणून 58 वर्षीय अनिता जाधव, 51 वर्षीय मनीषा टाकळकर काम करत आहेत. त्याचबरोबर दत्तात्रय लगड, संभाजी जाधव, राजू शेट्टी, सुरेश बडवे, नागेश टिंग्रे, स्नेहल माने यांनी कामात झोकून दिले आहे.

(A team of 20 people is working for swab examination in kolhapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT