वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत शासकीय रुग्णालयात उपचार सेवा दिली जाते.
कोल्हापूर : राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील २५० वर डॉक्टरांच्या (doctors) नोकऱ्या आठ महिन्यापूर्वी गेल्या होत्या. तसेच सहाय्यक प्राध्यापकांच्या पदोन्नत्या रद्द करून त्यांना त्यामुळे पदावर पाठवले होते. याबाबत दै. सकाळ मधून आवाज उठवला. तसेच वैद्यकीय संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार जवळपास ४०० नवीन सहाय्यक प्राध्यापकांची (डॉक्टर) भरती करता येणार असून कोरोना महामारी विरूद्धच्या लढाईला आणखी बळकटी येईल असे मानले जात आहे, अशी माहिती वैद्यकीय संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते यांनी दिली. (About 400 new assistant doctors will be recruited)
वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत शासकीय रुग्णालयात उपचार सेवा दिली जाते. काम करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टरांना १ दिवसांचा खंड देऊन ३६५ दिवसांचे नियुक्तीचे आदेश देण्यात येत होते. याप्रक्रियेनंतर २८२ सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक पदावर तसेच १२४ सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदावर पदोन्नतीवर रूजू झाल़े होते. त्यामुळे शासनाला नवीन वैद्यकिय महाविद्यालय सुरू करणे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी संख्या वाढविणे शक्य झाले होते.
गेल्या आठ महिन्यापासून हे सर्व प्राध्यापकांना प्रशासकीय कारणास्तव नियुक्ती आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती तर काही महाविद्यालयांमध्ये पुढील आदेश नसल्यामुळे वेतन रोखणे, पदावनत करणे अशा प्रक्रिया देखील झाल्या होत्या. आधीच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते, कालबद्ध पदोन्नती व वेतन श्रेणी, जोखीम इत्यादी भत्ते, थांबवणे, असे प्रकार घडत होते. कोरोना महामारीच्या काळात अनुभवी डॉक्टरांच्या नोकऱ्याही गेल्या. यातून वैद्यकीय अध्यापकांवरच अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती.
संघटनेने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यामार्फत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मंत्री देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून वैद्यकिय महाविद्यालयातील ४०० शिक्षकांच्या तदर्थ पदोन्नतीची मागणी मार्गी लावत सचिव सौरभ विजय यांच्यामार्फत संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना तदर्थ पदोन्नतीचे आदेश काढण्याच्या सूचना केल्या. हे आदेश प्रत्येक महाविद्यालयास पाठवले आहेत. त्यामुळे ४०० नवीन सहाय्यक प्राध्यापकांची भरती करणे शक्य होणार आहे असेही डॉ. मोहिते यांनी सांगितले.
‘सकाळ’ने मांडले वास्तव
कोरोनाकाळात उपचार सेवा देणाऱ्या राज्यातील २५० डॉक्टरांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर कोरोना उपचाराबरोबर नियमित आजारांवरील उपचार सेवेसाठी डॉक्टरांची संख्या कमी पडू शकते, ही बाब दै. सकाळ मधून मांडली. संघटनेकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबतही वृत्तही दै. सकाळमधून प्रसिध्द झाले यासाऱ्याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने दखल घेतली. प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली, असे डॉ. मोहीते यांनी सांगितले. (About 400 new assistant doctors will be recruited)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.