accident on gadhinglaj gargoti highway two death in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : ट्रक-मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार; पांगिरेजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी (कोल्हापूर) : गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील पांगिरे गावानजीक ट्रकचा टायर फुटून झालेल्या ट्रक-मोटरसायकलच्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. युवराज महिपती परीट (वय ४२, रा. ठिकपुर्ली, ता. राधानगरी), नंदकुमार पांडुरंग गायकवाड (वय ४२, रा. माजगाव, ता. राधानगरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. 

गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पिंपळगावकडून गारगोटीकडे ट्रक (एम एच ०९ एफ एल २००३) येत होता. यावेळी ट्रकचा उजव्या बाजूचा टायर फुटला. यादरम्यान पिंपळगावकडे जाणाऱ्या मोटरसायकलवरील (एम एच ०९ इ एच ४०४२) दोघांना फरफटत घेऊन ट्रक खडकमाळ वस्ती जवळील शेतात पलटी झाला. यावेळी झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार युवराज परीट पुढच्या चाकात सापडल्याने जागीच ठार झाले. तर नंदकुमार गायकवाड हे गंभीर जखमी  झाले होते. परंतु पुढील उपचारासाठी घेऊन जाताना उपचारापूर्वीत त्यांचा मृत्यू झाला. अपघातात ट्रकची पुढील दोन्ही चाके तुटून पडली होती. याबाबत पोलिस पाटील संदीप गुरव यांनी पोलिसात वर्दी दिली. पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT