कोल्हापूर

कोल्हापुरकरांना दिलासा; 40 दिवसानंतर रुग्णसंख्या 1000 च्या खाली

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच असून ते चिंताजनक आहे

निवास चौगले

कोल्हापूर : जिल्ह्यात (kolhapur district) एप्रिलपासून कोरोनाच्या रुग्णांची (covid-19 patients) संख्या वाढत असताना मे महिन्यात कोरोनाचा कहर झाला. ११ मेपासून सुरू झालेला कोरोनाचा हा कहर कमी झाल्याचे दिसून येत असून, तब्बल ४० दिवसांनी जिल्ह्यातील रोजची कोरोनाबाधितांची संख्या एक हजारापेक्षा कमी होऊन ९४० झाली आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच असून ते चिंताजनक आहे.

जिल्ह्यात १ एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या १२२ तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर मात्र कोरोनाबाधितांसह मृत्यूंची (corona dead patients) संख्याही वाढतच राहिली. २५ एप्रिल रोजी पहिल्यांदा कोरोनाबाधितांच्या संख्येने रोजचा एक हजाराचा टप्पा पार केला. त्या दिवशी जिल्ह्यात १०७१ बाधित तर ३३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा बाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाली होती मात्र मृत्यूचा आकडा ३० च्या खाली येत नव्हता.

मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच राहिली. २ ते ४ मे अखेर एक हजारापेक्षा कमी असलेली संख्या ८ ते ९ मे या कालावधीत पुन्हा कमी झाली, पण ११ मे पासून २० जूनपर्यंत रोज एक हजारपेक्षा जास्त रुग्ण तर मृत्यूची संख्या अपवाद वगळला तर ४० च्या पुढेच राहिली होती. १२ मे रोजी २२७४ तर २६ मे रोजी सर्वाधिक २५९९ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळले तर १५ मे रोजी सर्वाधिक ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यात १५ जून रोजी तब्बल ४० दिवसांनी मृत्यूंची संख्या २८ आली, त्यानंतर पुन्हा ही संख्या आजपर्यंत वाढतच राहिली आहे. तत्पूर्वी ११ जून रोजी कोरोनामुळे २९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. १८ मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झालेल्‍यांची संख्या केवळ १५ होती. त्यानंतर ही संख्या वाढतच असून आजही कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT