karntak bus sakal meda
कोल्हापूर

सात महिन्यांनंतर ती आली अन् माघारीही गेली

सात महिने झाले बंद असलेली कर्नाटक एसटी भाऊबिजेला शहरात धावली. यामुळे प्रवाशांत आनंद होता मात्र एसटी कर्नाटकात परतीच्या मार्गावर निघाली, ती त्यानंतर पुन्हा फिरकली नाही

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : सात महिने झाले बंद असलेली कर्नाटक एसटी भाऊबिजेला शहरात धावली. यामुळे प्रवाशांत आनंद होता मात्र एसटी कर्नाटकात परतीच्या मार्गावर निघाली, ती त्यानंतर पुन्हा फिरकली नाही. कर्नाटकातून केवळ एकच फेरी शहरात का आली, याचे नेमके कारण इचलकरंजी बस स्थानकातून प्रवाशांना जेव्हा समजले. तेव्हा प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला. मात्र अद्यापही एसटीत बसून शहरातून कर्नाटकात जाण्यास प्रवाशांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

शनिवारी एसटी बोरगावपर्यंत आल्यानंतर महाराष्ट्रातील एका प्रवासी महिलेचे मंगळसूत्र हरवल्याची घटना घडली. या वेळी या महिलेने बसमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यांनतर या महिलेसह महाराष्ट्रात येणाऱ्या‍ अन्य प्रवाशांनी इचलकरंजीत सोडण्याची विनंती केली. वाढता गोंधळ पाहता त्यानंतर बसचालकाने एसटीतील प्रवाशांना इचलकरंजी शहरात आणून सोडले. त्यामुळे कर्नाटकची बस शनिवारी इचलकरंजीत धावली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कर्नाटक-इचलकरंजी एसटी सेवा ठप्प झाली आहे. सात महिने ओलांडले तरी निपाणी, बेळगाव आगारातून एकही एसटी शहरात येत नाही. यामुळे सीमाभागासह इचलकरंजीतून कर्नाटकात होणारी दैनंदिन प्रवाशांचा गैरसोय झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर ती तरी एसटी सेवा सुरू होईल, अशी आशा प्रवाशांना होती. भाऊबिजेला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातून निपाणी आगाराची एसटी शहरात आली. एसटी दिसताच बस स्थानकावरील प्रवाशांत आनंद संचारला. एसटी सेवा सुरू झाली असे प्रवाशांना वाटत असताना दुसऱ्या तासानंतर दिवसभर मात्र कर्नाटकातून एकही बस शहरात फिरकली नाही. याबाबत प्रवाशांनी बस स्थानकातत चौकशी केली असता एसटीची केवळ एक फेरीच आल्याचे कारण समजले. सध्या निपाणी, बेळगाव आगारातून एसटी सेवा बोरगावपर्यंत मर्यादित आहे. बोरगावच्या पुढे सीमा असल्याने कर्नाटक एसटी पुढे धावत नाहीत.

साहेब, भाऊबिजेला तरी सोडा

दिवाळीचा हंगाम त्यात भाऊबीज म्हणजे एसटीसाठी दिवाळीच असते. वर्षभरातील रेकॉर्डब्रेक उत्पन्न एसटी आगार मिळवते. शनिवारी इचलकरंजी बस स्थानकावर कर्नाटक सीमाभागात व कर्नाटकात जाण्यासाठी अनेक प्रवासी दाखल झाले. मात्र इथून कर्नाटकात जाण्यासाठी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात एसटी सेवा बंद आहे. खासगी वाहतुकीच्या अवाजवी दरामुळे साहेब भाऊबीजला तरी कर्नाटकात एसटी सोडा, अशी विनंती प्रवासी करताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT