कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल दारुच्या नशेत; दोघेजण ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

फोन नंबर मिळाल्यानंतर कॉल करणाऱ्यांच्या शोधासाठी पथकं नेमली होती.

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी अंबाबाई मंदिरात बॉम्बच्या अफवेनं खळबळ उडाली होती. यासंदर्भात फोन कॉल आल्यानंतर पोलिसांनी दर्शन थांबवून परिसरात बॉम्बचा शोध घेतला. आता या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली आणि परिसर चेक केला. त्यानंतर बॉम्ब नसल्याची खात्री करून दर्शन सुरु करण्यात आले. फोन कुणी केला याचा शोध घेण्यासाठी तो कोणत्या क्रमांकावरून आला होता याची माहिती घेण्यात आली होती.

फोन नंबर मिळाल्यानंतर कॉल करणाऱ्यांच्या शोधासाठी पथकं नेमली होती. मोबाईल नंबर हा बाळासो कुरणे या व्यक्तीच्या नावे असल्याचं समोर आलं आहे. मात्र नंबर त्याचा जावई वापरत होता. ज्या व्यक्तीचा फोन आहे त्याच्या जावयाने दारुच्या नशेत फोन केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येईल.

न्यायालयाच्या परवानगीनुसार पुढचा तपास करणार आहे. दोघांना ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक माहिती अशी समोर आली की, दारुच्या नशेत जावयाने फोन केला अशी माहिती सासऱ्याने दिली. आता त्यामागचा उद्देश वेगळा होता का याची चौकशी केली जाईल. जावयाचे सुरेश लोंढे असं नाव आहे. सासरा बाळासो कुरणे हा हातकणंगले तालुक्यात राहतो. त्यांना हातकणंगलेतून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! राज्यात ९००० शिक्षकांची भरती; मे २०२६ पर्यंतची रिक्त पदे भरणार; पवित्र पोर्टलद्वारेच भरती प्रक्रिया; ‘टीईटी’चा निकाल याच महिन्यात

फलटण तालुका हादरला! सस्तेवाडीत मध्यरात्रीत एकाचा खून; दोघांना अटक, शेतात ससे पकडण्यास गेला अन् काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 07 जानेवारी 2026

Cafe Style Grilled Sandwich: कॅफेस्टाइल ग्रिल सँडविच बनवा आता घरच्या घरीच ! फक्त तवा अन् ‘ही’ सोपी ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT