Anganwadi Workers Demand Exclusion Of Corona Survey Work Kolhapur Marathi News
Anganwadi Workers Demand Exclusion Of Corona Survey Work Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोरोना कामातून वगळ्याण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी

अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम हाती घेतली आहे. त्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. मात्र, ही जबाबदारी सांभाळत नियमित काम करणे अशक्‍य आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून वगळावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेने केली. येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आहार वाटप, लसीकरण, वजने घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्‍य तिथे मुलांशी संवाद, सीएएसवर फोटो व माहिती अपलोड करणे आदी कामे आहेत. त्यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी करून घेऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, तरीही या मोहिमेची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे.

हे काम केल्यानंतर मुलांना, स्तनदा, गरोदर मातांना संसर्ग होईल, याचा विचार करून माझे कुटुंब माझी जबाबदारीतून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वगळावे. अन्यथा 21 सप्टेंबरपासून नियमित कामाव्यतिरिक्त अन्य कामात सहभागी होणार नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे. 

बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद गजगेश्‍वर यांनी निवेदन स्वीकारले. अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक, तालुकाध्यक्षा अंजना जाधव-शारबिद्रे, राजश्री बाबन्नावर, सुरेखा गायकवाड, मालुताई केसरकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन - सचिन चराटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT