aniket and sanika suicide case in chuye karveer kolhapur crime news marathi 
कोल्हापूर

अनिकेत आणि सानिकाच्या निर्णयाने गावात स्मशान शांतता ; दोघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला याचीच चर्चा 

राजू पाटील

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील चुये येथील तरुण तरुणींने विषप्राशन करुन अात्महत्या केल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबध होते अशी चर्चा आहे. मात्र मृत तरुणींने लग्नाच्या खर्चामुळे घरच्यांवर कर्ज  होऊ नये म्हणून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली अाहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, 
चुये गावातील अनिकेत पाटील (वय 19 ) याने मंगळवारी दुपारी विष प्राशन केले. दरम्यान त्याचवेळी सानिका व्हनाळकर हिनेही विषप्राशन केले. या दोघांनाही उपचारासाठी कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र रात्री उशीरा अनिकेत याचा मृत्यू झाला तर रात्रभर मृत्यूशी झुंज देऊन सानिका हिची प्राण ज्योत आज मालवली. या दोघांचेही प्रेमसंबध असल्याने त्यातूनच दोघांनीही आत्महत्या केल्याची चर्चा आहे.


या दोघांच्या मृत्यूमुळे गावभर हळहळ व्यक्त होत आहे. यातील मृत तरुणीने आपल्या लग्नाच्या खर्चामुळे घरच्यांना कर्ज होऊ नये आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळेआत्महत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणाची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे.

काल दुपारनंतर गावातील दबक्या आवाजातील  चर्चेला वाट झाली. रात्री दोघांचा जीव धोक्यात होता  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापलीकडे काहीच उरणार नाही अशी तरुण मित्रांच्या मध्ये चर्चा सुरू होती तर बहुतेक सर्व वयोवृद्ध मंडळी टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी घरच्या मंडळींना किंवा संबंधित मंडळींना याची हकीगत सांगितली असती तर दोघांचे जीवन  नव्याने सुरू झाले असते. अशी चर्चा सुरू होती. काल सकाळी अनिकेतचे रक्षाविसर्जन झाले तर आज सानिकावर अंत्यसंस्कार झाले.

मित्रपरिवाराला बसला धक्का. 
अनिकेतने दुपारी एकच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले होते; मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त गावात कळताच त्याच्या मित्रपरिवाराला धक्का बसला. 

सानिकाने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या 

“मामी, मामा, आई, मम्मी मी हे पाऊल उचलत आहे कारण माझ्यामुळे मम्मीला त्रास नको. माझ्या लग्नाचं कर्ज व्हायला नको तिच्या डोक्यावर. पप्पा असे वागतात. मला आता सहन होईना झालंय. सोन्याचं आणि नयनचं आयुष्य व्यवस्थित करा. यात मामींना दोष देऊ नका, त्यांना यातलं काहीही माहित आणि जमलं तर माफ करा मला… तुमची सानिका”

सानिका आणि अनिकेतच्या आत्महत्येने तरूण वर्गात मात्र चर्चेचा विषय बनला आहे. मात्र आज गावावर शोककळा पसरली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT