Belgaum Black Day Rally  esakal
कोल्हापूर

Belgaum Black Day : कर्नाटक प्रशासनाचा विरोध झुगारून हजारो मराठी भाषिक उतरले रस्त्यावर; रॅलीत बालचमूंसह युवावर्गाचा मोठा सहभाग

गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या मराठी भाषिकांतर्फे बुधवारी काळा दिन पाळला जात आहे.

मिलिंद देसाई

काळा दिनाच्या फेरीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे प्रशासनाकडे रितसर परवानगी मागण्यात आली होती.

बेळगाव : कर्नाटकी प्रशासनाची दडपशाही झटकून काळा दिनाच्या फेरीत हजारो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे फेरीच्या मार्गावर बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या मराठी भाषिकांतर्फे बुधवारी काळा दिन पाळला जात आहे. काळा दिनाच्या फेरीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) प्रशासनाकडे रितसर परवानगी मागण्यात आली होती.

मात्र, प्रशासनाने शेवटपर्यंत परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली, परंतु मराठी भाषिकांनी दडपशाही झुगारून हजारोंच्या संख्येने काळा दिनाच्या फेरीत सहभाग घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र मराठी भाषिकांची गर्दी दिसून येत असून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात येत आहे.

तसेच बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार फेरीच्या माध्यमातून केला जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह बालचमू आणि युवावर्ग प्रचंड संख्येने फेरीत सहभागी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT