Wedding Ceremony esakal
कोल्हापूर

Belgaum : बहिणीच्या लग्नाची तारीख पुढं ढकलल्यामुळं भावाची गळफास घेऊन आत्महत्या

नवनाथच्या बहिणीचा विवाह निश्चित झाला होता. २९ मे रोजी विवाहाची तारीख ठरवली होती.

सकाळ डिजिटल टीम

घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बेळगाव : बहिणीच्या लग्नाची (Wedding Ceremony) तारीख एक दिवस पुढे ढकलल्याने लग्न समारंभाला पै-पाहुणे येणार नाहीत, या काळजीने भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नवनाथ आनंद काकतकर (वय २२, रा. लक्ष्मीगल्ली, हिंडलगा) असे त्याचे नाव असून शुक्रवार (ता.१९) पहाटे ५ च्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

पोलिसांतून (Belgaum Police) समजलेली अधिक माहिती अशी, नवनाथच्या बहिणीचा विवाह निश्चित झाला होता. २९ मे रोजी विवाहाची तारीख ठरवली होती. त्यामुळे लग्नपत्रिका देखील छापल्या होत्या. मात्र, त्या तारखेला कुठेही मंडप उपलब्ध नसल्याने कुटुंबियांनी एक दिवस विवाह पुढे ढकलून ३० मे रोजी करण्याचे ठरविले.

त्यामुळे असे झाल्यास बहिणीच्या लग्नाला पै-पाहुणे येणार नाहीत. या कारणातून नवनाथने काल रात्री जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT