Bhogavati Sugar Factory Election esakal
कोल्हापूर

Bhogavati Factory Election : 'भोगावती'चं राजकारण तापलं! निवडणुकीत बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप, खमक्या नेत्याची सभासदांना प्रतीक्षा

वैभवशाली कारखान्याला घराणेशाही, पै-पाहुण्यांचे राजकारण, बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप आणि बेफिकीरीची नजर लागली आहे.

राजेंद्र पाटील

एकेकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची या कारखान्याचा सभासद होण्याची मनीषा सर्वपक्षीय नेत्यांनी हाणून पाडली होती.

राशिवडे बुद्रुक : भोगावती साखर कारखाना (Bhogavati Sugar Factory Election) हा अतिशय कमी गावांची संख्या आणि नजरेत टप्प्यात बसणारा परिसर असूनही कर्जाच्या खाईत आहे. वैभवशाली कारखान्याला घराणेशाही, पै-पाहुण्यांचे राजकारण, बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप आणि बेफिकीरीची नजर लागली आहे. तो वाचलाच पाहिजे अन्यथा कामगार, सभासद शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.

यातून बाहेर काढणाऱ्या एखाद्या खमक्या नेत्याची सभासदांना प्रतीक्षा आहे. सर्वोत्तम गाळप करणारा आणि देशातील अव्वल दर देणाऱ्या कारखान्याचे विस्तारीकरण झाले आणि घरघर लागली. स्थापना करणारी पिढी गेली आणि आत्मीयता संपली. अतिरिक्त नोकर भरती, चुकीची साखर विक्री, नियोजनाचा अभाव हे बिकट परिस्थितीचे कारण ठरले. दहा वर्षांपूर्वी ए. वाय. पाटील, के . पी . पाटील यांनी थेट हस्तक्षेप करून ‘भोगावती’च्या निवडणुकीत सहभाग घेतला, सत्ता आणली.

मात्र, त्या पाच वर्षात ‘ए. वाय.’ यांचा हस्तक्षेप इतका वाढला की संचालक मंडळात दुफळीच झाली. त्यानंतर पक्षापेक्षा गटा-गटांचे राजकारण निर्माण झाले. नरके गट, सतेज पाटील गट, महाडिक गट, आबिटकर गट या माध्यमातून बाह्य नेत्याशी सल्लामसलती होऊ लागल्या. यामुळे येथील नेत्यांमधील खमकेपणाचा अभाव पुढे आला. काही दिवसांपूर्वीही आघाडी बुलंद करण्यासाठी ए. वाय. पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला. ते या कारखान्याची सभासद नाहीत की त्यांचा ऊस येत नाही.

एकेकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची या कारखान्याचा सभासद होण्याची मनीषा सर्वपक्षीय नेत्यांनी हाणून पाडली होती; पण कौलवकर व सडोलीकर वगळून आता बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप सभासद स्वीकारणार काय? हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.

नोकर भरतीतही हस्तक्षेप...

भोगावतीच्या तत्कालीन संचालक मंडळाने ५८० कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यावेळी कार्यक्षेत्राबाहेरील नेत्यांनी नको तेवढा हस्तक्षेप करत स्थानिकांना डावलत बाहेरील तरुणांना नोकरी लावत आर्थिक व्यवहारही केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे सभासद कमालीचे अस्वस्थ आहेत. या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी यंत्रणा भोगावती परिसरात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Life Certificate: पेन्शनधारकांनो, आता बँकेत जाण्याची गरज नाही! मोबाईलवरूनच जमा करा लाइफ सर्टिफिकेट; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Koyna Hydroelectric Project : चिंताजनक! सह्याद्रीच्या डोंगरातून वाहतोय धबधबा; कोयनेच्या सर्जवेलमधून गळती, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय, पाणीटंचाईचा धोका

Marathi News Live Updates : सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, कंदलगाव आणि अंत्रोळीतून १७ लाखांचे खाद्यतेल, पनीर जप्त; सांगोल्यातही दूध डेअरीवर छापा

Ajay Devgn: अजय देवगणची उच्च न्यायालयात धाव, 'विमल' प्रकरणी एफडीएच्या नोटिशीला आव्हान

जनगणनेत ११ नवे प्रश्न, दीड महिना चालेल प्रक्रिया; पहिल्यांदाच दुसरा टप्पा ५० दिवसांचा, कधी सुरुवात?

SCROLL FOR NEXT