Bidri Factory Election Hasan Mushrif  esakal
कोल्हापूर

Bidri Factory Election : केपींमुळेच 10 हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळेल; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

इर्षेपोटी विद्यमान आमदारांनी इथेनॉल प्रकल्पासाठीचे इरादापत्र अडवले होते.

सकाळ डिजिटल टीम

'ऊस उत्पादकाची वाढलेली आर्थिक सक्षमता टिकवण्यासाठी म्हणजेच अधिकाधिक दर मिळविण्यासाठी के.पीं.कडेच सत्ता गरजेची आहे.’

बिद्री : पगार, बोनससह सर्व देणी वेळेत देणाऱ्या ‘के.पीं’च्या योगदानामुळे महालक्ष्मी आघाडीला १० हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळेल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला. महालक्ष्मी आघाडीच्या (Mahalakshmi Aghadi) वाघापूर (ता. भुदरगड) येथील प्रचार प्रारंभावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, के. पी. पाटील (K. P. Patil) उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, ‘के. पी. पाटील यांनी जास्तीत जास्त दर देऊन कर्मचाऱ्यां‍ना ३० टक्के बोनस दिला. इर्षेपोटी विद्यमान आमदारांनी इथेनॉल प्रकल्पासाठीचे इरादापत्र अडवले होते. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रश्न सोडविला.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ऊस उत्पादकाची वाढलेली आर्थिक सक्षमता टिकवण्यासाठी म्हणजेच अधिकाधिक दर मिळविण्यासाठी के.पीं.कडेच सत्ता गरजेची आहे.’ अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘४,५०० क्रशिंग असणारी क्षमता ८००० टनांवर नेली. को -जनरेशन प्रकल्प यशस्वीरित्या उभारला. इथेनॉल प्रकल्पही दोन महिन्यांत कार्यान्वित होईल. विरोधक द्वेषबुद्धीतून खोटे आरोप करीत आहेत.’

या वेळी दिनकरराव जाधव यांनी केपींनी चांगला कारभार केल्याचे सांगितले. काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी स्वागत केले. याप्रसंगी संजय घाटगे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंसह फत्तेसिंह भोसले, भिकाजी एकल, शरद पाडळकर, सुनील कांबळे आदींची भाषणे झाली. यावेळी प्रहार संघटनेसह विविध गटांच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी ओळख करून दिली. याप्रसंगी युवराज पाटील, भैया माने, धैर्यशील देसाई, अंबरीश घाटगे, जी. डी. पाटील, धैर्यशील पाटील-कौलवकर, मनोज फराकटे, सुयोग वाडकर, सचिन घोरपडे, विठ्ठल मुसळे, जगदीश लिंग्रस, बाळासाहेब पाटील आदींसह उमेदवार उपस्थित होते. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन, प्रवीणसिंह पाटील यांनी आभार मानले.

हे माझेच पाप.....

के. पी. पाटील म्हणाले, ‘विद्यमान आमदारांच्या नावावर जमीन नसताना आवश्यक गरजांची पूर्तता करून घेऊन सभासद केले. हे माझेच पाप असून आता त्यांच्या नावावर किती व कुठे जमिनी आहेत यावरचे भाष्य योग्यवेळी करेन.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी 'महायुद्ध'; ६० जागांसाठी तब्बल ५५० इच्छुक मैदानात!

Silent Heart Attacks in Women: छातीत दुखत नाही, तरी हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितला महिलांमधील लपलेला धोका

Latest Marathi News Live Update : मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२९ वर

Koregaon Bhima Vijay Stambh : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त; सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर!

Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

SCROLL FOR NEXT